नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतचा आदर्श उपक्रम विधवा पुनर्विवाह लावून दिली ११,००० रु आर्थिक मदत…
नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतचा आदर्श उपक्रम विधवा पुनर्विवाह लावून दिली ११,००० रु आर्थिक मदत…
नेवासा प्रतिनिधी – सौंदाळा ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता ई. प्रकारच्या एकल महिलांच्या पुनर्विवाह साठी ११,०००/- आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले होते या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करून विधवा पुनर्विवाह लावून आर्थिक मदत देऊन सौंदाळा ग्रामपंचायत ने आदर्श उपक्रम केला आहे.
ज्या एकल महिलांना पुनर्विवाह करण्याची इच्छा आहे त्यांना ग्रामपंचायत मार्फत आर्थिक हातभार लावण्यात येणार आहे.पतीचे निधन झाल्याने महिलेला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. साथीदार गमावल्यानंतर येणारे दडपण देखील मोठे असते. बऱ्याचदा अश्या महिला या सामाजिक आधार गमावतात तसेच त्यांना उत्पन्नाचे साधन देखील गमवावे लागते त्यामुळे अशा महिलांचे पुनर्वसन व्हावे व समाजात एक चांगला संदेश प्रसारित व्हावा अशी लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांची इच्छा होती.
अकाली आलेले विधवा पण, खांद्यावर लहान लेकरांची जबाबदारी आणि शिक्षणाचा खर्च, लवकर आलेल्या विधवा पण मुळे माहेरात राहावे लागणे, विविध टोमणे व इतर त्रासाला सामोरे जाणे ई. मुळे एकल महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.
सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रमोद झिंजार्डे यांच्या ‘ विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा ‘ या अभियानाला नजरेसमोर ठेवून सरपंच शरदराव आरगडे यांनी सदरची योजना कार्यान्वीत करून अंमलात आणली आहे.
सौंदाळा ग्रामपंचायत गावातील एकल महिलांच्या पुनर्विवाह करण्यासाठी संबंधित महिलेला ११,०००/- अनुदान स्वरूपात देत आहे.सदर योजनेमुळे समाजात एक चांगला संदेश प्रसारित होऊन सर्व वंचित आणि गरजू महिलांना त्याचा निच्छित फायदा होईल असे दिसून येत आहे. सदर योजनेला “आमची लेक, आमची जबाबदारी” या नावे कार्यान्वीत केले असून सौंदाळा ग्रामपंचायत ही एकल महिलांना मदत देणारी महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे .
राणी लक्ष्मण ससाने ही सौंदाळा येथील कन्या पाचुंदा या ठिकाणी दिलेली होती विवाहानंतर एक मुलगी दोन मुले असे अपत्य झाल्यानंतर पती आजारपणात वारले त्यानंतर राणी आपल्या माहेरात सौंदाळा या ठिकाणी राहत होती.
सौंदाळा येथे रोजी रोटी चालविण्यासाठी मुलांचा सांभाळ करण्यासाठी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती सदरची बाब सरपंच शरदराव आरगडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा अविवाहित लहान दिर बाबासाहेब ससाणे यास तिच्याशी विवाह करण्यासाठी विचारपूस करून तयार केले व विवाहास ग्रामपंचायतीने ११,०००.रु अर्थसहाय्य करून विवाह लावून दिला.
त्यामुळे राणी हिस पुढील आयुष्यासाठी जोडीदार मिळाला तसेच तिच्या लहान मुलांसाठी बापाचं छत्र देखील मिळाल या विवाहमुळे नेवासा तालुक्यातून ग्रामपंचायतच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे अशा प्रकारे विधवा पुनर्विवाह साठी महाराष्ट्रातील सरपंचांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सरपंच श्री.शरदराव आरगडे यांनी केले आहे.