नूतन मराठी प्राथमिक शाळा, अहमदपूर
नूतन मराठी प्राथमिक शाळा, अहमदपूर
चिमुकल्या वारकऱ्यांनी अनुभवली पंढरीची वारी
अहमदपूरः नूतन मराठी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी पंढरपूरची वारी अनुभवलीः दिंडी व पालखी निघण्यापुर्वी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करण्यात आले. सहशिक्षिका पोलावार एस. पी. यांनी विविध भक्तांना विठूरायाचे दर्शन घडलेल्या कथा सांगितल्या. त्यानंतर शाळेच्या परिसरात चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली.
यासाठी मुख्याध्यापिका गायकवाड के. आर. यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून संस्थेचे अध्यक्ष मा. आबासाहेबजी देशमुख व सचिव अक्षयभैया देशमुख यांनी कौतूक केले. यासाठी कुलकर्णी एस. एस., पोलावार एस.पी., बेंबळे एन. एम., श्री कोतलापुरे एसः पीः, श्रीमती बिरादार पी.डी., श्रीमती • देशमूख एम. एस., श्री उप्परवाड एस.एच. यांनी पुठ्ठेवाड एस. जी. यांनी पुढाकार घेतला. सर्वत्र आनंददायी वातावरण निर्माण झाले. आसमंत विठूरायाच्या नामाने दणाणून गेला.सर्व पालकानी आनंद व्यक्त करून गुरुजनाचे आभार मानले