नियमांचे पालन करून जयंती उत्सव साजरे करा- पो.नि.सुभाषचंद्र मारकड
नियमांचे पालन करून जयंती उत्सव साजरे करा- पो.नि.सुभाषचंद्र मारकड
**************
भोकर( तालुका प्रतिनिधी) भोकर शहराची शांततेची परंपरा आहे येथील सामाजिक वातावरण चांगले असून येणाऱ्या सण उत्सवाच्या काळामध्ये नियमांचे पालन करून सण उत्सव साजरे करावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये बोलताना केले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व पुढे येणाऱ्या सण उत्सवाच्या निमित्ताने भोकर पोलीस स्टेशन येथे 29 जुलै रोजी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी भोकर शहरात साजरे होणारे सण उत्सव जयंती नियमांचे पालन करून साजरे करावेत,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचनीय असून त्यामधून प्रेरणा मिळते त्यांच्या जयंती उत्सवामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावे असे सांगून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे लावता येणार नाही,मिरवणुकीमध्ये कोणी दारू पिऊन धिंगाणा घालीत असेल तर मंडळांनी त्याला बाहेर काढावे,बाहेरील व्यक्ती येऊन गोंधळ करीत असेल तर पोलिसांना कल्पना द्या, मोबाईल वरून कोणतेही मेसेज पाठवू नका आजकाल युवकांनी मोबाईल वरून कोणतेही मेसेज पाठवणे सुरू केले आहे हे चुकीचे आहे,भोकर शहरात येणारे सण उत्सव सर्वांनी मिळून नियमांचे पालन करून साजरे करा असे आवाहन त्यांनी केले या बैठकीस पत्रकार बी.आर.पांचाळ,बाबुराव पाटील,उत्तम बाबळे,बालाजी नारलेवाड,मनोज चव्हाण यांच्यासह मिर्झा ताहेर बेग,मिलिंद गायकवाड,के.वाय.देव कांबळे,दिलीप वाघमारे, संग्राम वाघमारे,सखाराम वाघमारे व सर्व सदस्य उपस्थित होते पोलीस कर्मचारी परमेश्वर गाडेकर यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले आभार पो.उ.नि.सुरेश जाधव यांनी मानले