नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दुध दरवाढीसाठी काळे यांनी निवेदन दिले…
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दुध दरवाढीसाठी काळे यांनी निवेदन दिले…
नेवासा प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे पाटील यांनी एक धक्कादायक आणि मोठी बाब निदर्शनास आणून दिले गेल्या तीन महिन्यापासून देत असलेले पाच रुपये दूध अनुदान हे लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेच नाही.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे व अटी शर्ती व खाद्याचे वाढलेले भाव पाहता शेतकऱ्याचे कंबरडे पार मोडले आहे.त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत ही आपली सरकारची अनुदानाची मदत पोहोचू शकत नाही व त्यामध्ये अटी शर्ती व ऑनलाईन व प्रशासकीय यंत्रणा यावर योग्य काम करत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.याप्रसंगी केलेल्या मागणीला शेतकऱ्याकडून दुजोरा देण्यात आला.शेतकऱ्यांच्या तळावरचे अनुदान खाणाऱ्या मधल्या चोरावर तात्काळ दंडात्मक कारवाई करा व व मागील दोन महिन्याचे थकित अनुदान जमा करून यापुढील अनुदान तात्काळ बंद करून शेतकऱ्याला थेट 35 रुपये हमीभाव द्यावा अशा मागणीचे निवेदन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले.