Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य
नागापूर येथे श्रामनेर शिबिराची सांगता
नागापूर येथे श्रामनेर शिबिराची सांगता
***********
भोकर( तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे नागापूर येथे 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान श्रामनेर शिबिर घेण्यात आले यामध्ये 16 शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता.
भगवान गौतम बुद्ध यांनी स्थापन केलेल्या बौद्ध धम्माच्या तत्त्वानुसार जीवन जगता यावे जीवनात चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा धम्माच्या तत्वांचे पालन व्हावे यासाठी श्रामणेर शिबिर घेतल्या जाते पूज्य भंते सारीपूत, भंते दीपरत्न भंते राजरत्न रत्न यांच्या मार्गदर्शनानुसार शिबिरात धम्माच्या शिकवणीचे आचरण करण्याविषयी सांगण्यात आले शिबिर यशस्वी करण्यासाठी अनुसया बाई व्यवहारे, साधना बाई रावळे, मनीषाबाई कसबे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिकांनी परिश्रम घेतले उपसभापती बालाजी शानमवाड यांच्या वतीने भोजनदान देण्यात आले