नांदेडच्या दोन माजी मंत्र्यांसह एका माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश: भाजपाला मोठा धक्का
नांदेडच्या दोन माजी मंत्र्यांसह एका माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश: भाजपाला मोठा धक्का
**********
नांदेड ( बी. आर. पांचाळ) माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत माजी आमदार ओम प्रकाश पोकर्णा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे नांदेड जिल्ह्यात भाजपाला राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
20 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे असून त्यांच्या स्नुषा माजी जिल्हा परिषद सदस्य मीनल खतगावकर यांच्यासह त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, माजी मंत्री डी.पी. सावंत यांनीही खा. अशोकराव चव्हाण यांची साथ सोडली असून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, माजी आमदार ओम प्रकाश पोकर्णा यांनीही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, राजेश पावडे आदींची उपस्थिती होती. दोन माजी मंत्री एक माजी आमदार यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्याने भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे