नगर परिषद उदगीर प्रभाग १६ : काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चंदन पाटील नागराळकर यांना वाढता प्रतिसाद

नगर परिषद उदगीर प्रभाग १६ : काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चंदन पाटील नागराळकर यांना वाढता प्रतिसाद
उदगीर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून चंदन बसवराज पाटील नागराळकर यांचा उमेदवारी अर्ज जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रचाराला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेणारा, त्यांच्या मदतीला तत्पर धावून जाण्याची वृत्ती असलेला आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा आदर्श ठेवणारा तरुण नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
चंदन पाटील नागराळकर हे उदगीर पंचक्रोशीतील सुसंस्कृत आणि समाजकार्यात अग्रेसर असलेल्या पाटील नागराळकर कुटुंबातील आहेत. त्यांच्या घराण्यात आजोबांपासून राजकीय आणि सामाजिक कार्याची परंपरा आहे. कै. मलशेटृटीअप्पा पाटील नागराळकर हे उदगीर पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले सभापती म्हणून परिचित होते. त्याचप्रमाणे त्यांचे वडील बसवराज पाटील नागराळकर हे कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि विविध शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मार्गदर्शक भूमिका निभावत आहेत.
उच्च शिक्षणासाठी त्यांनी लोणावळा, नॉर्थ कॅरोलिना (अमेरिका) आणि लंडन येथे वास्तव्य केले. हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या विषयातील उच्च शिक्षणानंतर जगप्रसिद्ध डॉयल कलेक्शन हॉटेल समूहात त्यांनी कार्य केले. परदेशात चांगला पगार आणि संधी असूनही मातृभूमीची ओढ कायम राहिल्याने त्यांनी परत येऊन उदगीरमध्येच समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले.
सध्या ते उदगीर येथील कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय आणि एम. व्ही. पाटील सीबीएसई पब्लिक स्कूल यांच्या व्यवस्थापनात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक विकासासाठी विविध उपक्रम राबविणे, शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करणे यासाठी ते नेहमीच शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत असतात. या संस्थेतून घडलेले अनेक विद्यार्थी आज सैन्य, प्रशासकीय सेवा आणि विविध व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शैक्षणिक संधी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील नेतृत्व देण्याची क्षमता चंदन पाटील नागराळकर यांच्यात आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील मतदारांनी विकासाचा मार्ग प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्षम उमेदवार म्हणून त्यांना निवडून देण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांकडून मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, उदगीर नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये महाविकास आघाडीने प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ. अंजुम फातेमा खादरी, प्रभाग 16 (अ) च्या उमेदवार मिर्झा रेश्मा जबीन अक्रम बेग आणि प्रभाग 16 (ब) चे उमेदवार चंदन बसवराज पाटील नागराळकर यांच्या प्रचार मोहीमेला दैनंदिन वाढता प्रतिसाद दिसून येत आहे.














































