Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्ताशालेय शिक्षण व क्रीडा
नंदकुमार स्वामी यांना कला गौरव पुरस्कार प्रदान
नंदकुमार स्वामी यांना कला गौरव पुरस्कार प्रदान
मानवत सौ ममता चिद्रवार – कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल येथील नंदकुमार स्वामी यांना राष्ट्रीय जंगम संघटनेच्या वतीने सोनपेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जंगम समाज मेळाव्यात कला गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले .
सोनपेठ येथील नंदिकेश्वर मठ संस्थान येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जंगम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रवण जंगम , प्रमुख पाहुणे सचिव चंद्रशेखर स्वामी, नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज हे उपस्थित होते .