देवगड येथील श्री किसनगिरीबाबांच्या पालखीचे पंचदिनात्मक सोहळयासाठी पंढरपूरकडे प्रस्थान
देवगड येथील श्री किसनगिरीबाबांच्या पालखीचे पंचदिनात्मक सोहळयासाठी पंढरपूरकडे प्रस्थान
नेवासा प्रतिनिधी – अमोल मांडण आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथील देवगडच्या मठात होणाऱ्या पंचदिनात्मक पारायण सोहळयासाठी नेवासा तालुक्यातील देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या पालखीचे गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे शनिवारी दि.१३ जुलै रोजी सकाळी प्रस्थान झाले.
प्रस्थानापूर्वी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीचे पूजन गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्री दत्त मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली.यावेळी उपस्थित भाविकांनी पंढरपूरकडे निघालेल्या गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे देवगड, देवगडफाटा, नेवासाफाटा, नगर येथे संतपूजन करून स्वागत केले.
यावेळी झालेल्या स्वागत व संतपूजन कार्यक्रम प्रसंगी संतसेवक नामदेव महाराज कंधारकर,हभप नारायण महाराज ससे,गणपत महाराज आहेर,बाळू महाराज कानडे,साहेबराव महाराज चावरे, संजय महाराज निथळे, शुभम महाराज बनकर,लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, सेवेकरी पंढरीनाथ जाधव, बाबासाहेब खोबरे, महेंद्र फलटणे, चांगदेव साबळे,सरपंच अजय साबळे, संदीप साबळे, उपसरपंच भीमाशंकर वरखडे, जेष्ठ व्यापारी विजय गांधी, अभिजित गांधी, खासदार वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे,इकबाल शेख, जळकेचे सरपंच कैलासभाऊ झगरे,पोलीस पाटील बाबासाहेब कानडे, आरोग्य सल्लागार भाऊसाहेब येवले सर,सोमनाथ वाखुरे,सुभाष चव्हाण,बद्रीनाथ फोलाणे, मनोज पवार बाल वारकरी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांचे जीवन आनंदमय व्हावे,देशाची एकता अखंडता दृढता सर्वांच्या अंतःकरणात टिकून रहावी हीच प्रार्थना पंढरीच्याविठुरायाच्या चरणी आम्ही करणार असल्याचे गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबांनी यावेळी बोलतांना सांगितले.
आषाढी वारी व एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील देवगडच्या मठामध्ये रविवारी दि.१४ जुलै पासून ते १८ जुलै या कालावधीत पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळा गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या मार्गदर्शनाखाली व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली होत आहे.त्यानिमित्ताने रविवारी दि.१४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पंढरपूर येथील मठातून श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखीची क्षेत्र प्रदक्षिणा होणार आहे.त्यामुळे या सोहळयातील सहभागी भाविक आपआपल्या वाहनांनी देवगडसह परिसरातून पंढरपूरकडे शनिवारी मार्गस्थ झाले.
पंढरपूर येथील देवगडच्या मठात होणाऱ्या पंचदिनात्मक गाथा पारायण सोहळयामध्ये सकाळी व दुपारच्या सत्रात श्री नामदेव गाथा पारायण तसेच दुपारच्या व सायंकाळच्या सत्रात भोजन प्रसाद,रात्री ८ ते १० कीर्तन असे कार्यक्रम होणार आहे.गुरुवारी दि.१८ जुलै रोजी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या काल्याच्या किर्तनाने पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळयाची सांगता होणार आहे.