दिव्यानंद स्वामीजींच्या समाधीवर शिवलिंगाची स्थापना
दिव्यानंद स्वामीजींच्या समाधीवर शिवलिंगाची स्थापना
मानवत सौ ममता चिद्रवार : मानवत येथील भारतीय संस्कृती स्वाध्याय केंद्र आंधारवड मारोती मंदिर परिसरात असलेल्या अनंत श्री विभूषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळु गुरुवर्य स्वामीजीं दिव्यानंद पुरी महाराज यांच्या समाधीवर सणस्टोन या पाषाण शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी ता २३ करण्यात आली .
सदरील धार्मीकविधी वेदशास्त्रसंपन्न गणेश गुरु बोरगावकर व सदाशिव जोशी यांच्या मार्गदर्शनात, महामंडलेश्वर 1008 श्री स्वामी मनीषानंद पुरी महाराज, चैतन्योदय गुरुकुल आश्रम जिंतूर चे स्वामी महेशानंद पुरी महाराज , महामंडलेश्वर 1008 श्री स्वामी हरिशानंदजी महाराज, ज्ञानचैतन्यजी महाराज, भारती चैतन्य जी महाराज, जयानंद पुरी महाराज, श्री राघवेंद्रानंद पुरी महाराज, श्री बबन भाऊ करपे यांच्या उपस्थितीत पूजा , होमहवन व पवित्र मंत्रोप्पचारात संपन्न झाला.
या महापूजेचे यजमानपद सौ. रीणा बालाजी पोकळे मानवत , सौ. चंदा मुकुंद कोकडवार जिंतुर व सौ. संध्याताई दिलीप चिद्रवार जिंतुर यांनी घेतले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी दिव्यानंद सत्संग परीवार जिंतुर व भारतीय संस्कृती स्वाध्याय केंद्राचे सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.