दर्जेदार शिक्षण हीच काळाची गरज… श्री जयप्रकाशजी दांडेगावकर
दर्जेदार शिक्षण हीच काळाची गरज — श्री जयप्रकाशजी दांडेगावकर
वसमत…. प्रतिनिधी….
दर्जेदार शिक्षण हीच सध्याच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री श्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी येथे आयोजित विद्यार्थी पालक मेळाव्यात केले. बहिर्जी स्मारक महाविद्यालया तर्फे दिनांक 3 आक्टोबर रोजी विद्यार्थी पालक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील ऊपलब्ध सोयी सुविधा, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेल्या योजना इत्यादी बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला व पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधावा व महाविद्यालयातील सर्व साधनांचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या महाविद्यालयात पायाभूत सुविधा, लायब्ररी, अभ्यासिका, खेळाचे मैदान, इनडोअर स्टेडियम, संशोधन केंद्र यासह इतर अनेक सुविधा उपलब्ध असुन नुकतेच बेंगलोर येथील नॅक कार्यालयातर्फे महाविद्यालयाला अ दर्जा प्रमाणपत्र दिले आहे, असा दर्जा मिळवणारे हिंगोली जिल्ह्य़ातील एकमेव महाविद्यालय असुन यापुढे दर्जेदार शिक्षण ही संकल्पना घेऊन पुढील वाटचाल सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात स्वायत्तता प्राप्त करण्यासाठी संस्था प्रयत्नरत राहणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी त्यांचे हस्ते वाचन कट्टा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा प्राचार्य डॉ मा मा जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातुन उपस्थितांसमोर सादर केला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप श्री मुंजाजीराव जाधव यांनी तर सुत्र संचलन प्रा डॉ अनिल मुगुटकर व आभार प्रदर्शन डॉ शारदा कदम यांनी केले. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर श्री पंडितराव देशमुख सर, अँड श्री रामचंद्रजी बागल, श्री उमाकांतराव शिंदे, श्री नितीन महागावकर, श्री राम झुंझुल्डे, अँड. रणधीर तेलगोटे, दौलत हुंबाड, श्याम कदम, विजय कडतन, गणेश कमळु, अयुबभाई यांच्यासह मोठय़ा संख्येने विद्यार्थी, पालक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.