आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्तासरकारी योजना

तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतची विद्युत वितरण कंपनीकडे एक कोटी पेक्षा जास्त थकबाकी…

नेवासा – तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतची विद्युत वितरण कंपनीकडे एक कोटी पेक्षा जास्त थकबाकी…

नेवासा प्रतिनिधी– नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे गावातील हद्दीत असलेल्या इलेक्ट्रिक पोल व ट्रान्सफार्मर याचा कर आकारलेला आहे त्याची थकबाकी १ कोटी ४३ लाऊ ५० हजार रु.एवढी आहे.त्याची नोटीस कंपनीस बजावली असून थकबाकी न भरल्यास कंपनीची मालमत्ता सील करणार असल्याचे सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले आहे.
सौंदाळा ग्रामपंचायतने माणगाव ग्रामपंचायत जि.रायगड च्या धर्तीवर विद्युत वितरणच्या पोल व ट्रान्सफार्मरला कर आकारणी केलेली आहे २०२१ पासून ग्रामपंचायतने सातत्याने नोटीस द्वारे कर मागणी केलेली आहे.
त्याबाबत कार्यकारी अभियंता ग्रामीण यांनी त्यांच्याच विभागास अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना मूल्यांकन करण्यासाठी पत्र दिलेले आहे परंतु पुढे कुठलीही कारवाई झाली नसल्याने ग्रामपंचायतने पुन्हा नोटीस बजावली आहे.
मुंबई उच्च न्यायालय यांनी ११ ऑगस्ट २०२१ मध्ये ग्रामपंचायतीला विद्युत वितरणच्या पोल व ट्रान्सफार्मर या मालमत्तेवर कर आकारणी करण्यासाठी माणगाव जि रायगड या ग्रामपंचायततीस परवानगी दिलेली आहे.
त्यामुळे सौंदाळा ग्रामपंचायतने देखील कर मागणी केलेली आहे
सदर थकबाकी तातडीने न भरल्यास सील बंद कारवाई करणार असल्याची नोटीस बजावलेली आहे.
सौंदाळा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या २२० केव्ही सबस्टेशनला ग्रामपंचायतने दर वर्षाला १८ लाख ७२ हजार ८७१ रु. आकारून वसुल देखील केलेले आहेत.त्याच पद्धतीने विद्युत वितरण कंपनी कडून वसुल करणार असल्याचे सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button