डॉक्टर्स डे निमित्ताने उपलब्ध औषधाची स्क्रीन चे लोकार्पण
डॉक्टर्स डे निमित्ताने उपलब्ध औषधाची स्क्रीन चे लोकार्पण
मानवत/प्रतिनिधी-येथील ग्रामीण रुग्णालयात १ जुलै डॉक्टर्स डे च्या निमित्ताने रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात उपलब्ध असलेल्या औषधाची यादी प्रदर्शित करणारी स्क्रीन बसवण्यात आली असून याचे रीतसर लोकार्पण१ जुलै रोजी दुपारी करण्यात आले .
मानवत ग्रामीण रुग्णालयात दररोज बाह्य रुग्णविभागात ३०० ते ४०० रुग्ण उपचारा करीता येत असतात. त्यांना रुग्णालयात उपलब्ध असलेल्या औषधाची यादी ठळकपणे दिसावी यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच ३ फूट लांब व ४फूट रुंद आकाराचा मोठा एलईडी स्क्रीन औषधाच्या यादीसह लावण्यात आला आहे.
१ जुलै डॉक्टर्स डे चे औचित्य साधून या स्क्रीनचे लोकार्पण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेंद्र वर्मा ,युनानी वैद्यकीय अधिकारी डॉ.कलीम शेख, औषध निर्माण अधिकारी शितल गायकवाड ,आरोग्य सेवक अकबर पठाण व आरोग्य सेविका रत्नमाला दाभाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या एलईडी स्क्रीनवर मानवत ग्रामीण रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात उपलब्ध असलेल्या औषधांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.जेणेकरून उपलब्ध औषधी रुग्णांना मिळण्यास मदत होईल असा यामागचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हाभरात जिल्हा सामान्य रुग्णालय सह सर्वच उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात अशा प्रकारच्या औषधाची यादी प्रसिद्ध करणाऱ्या एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे