जीवन सार्थकी लावणारी पंढरपूर वारी…..
जीवन सार्थकी लावणारी पंढरपूर वारी…..
वसमत. प्रतिनिधी. वसमत येथील आर्य वैश्य समाजातील महिला भगिनी सौ. संगीता सुनिल मुगुटकर, सौ. मंजुषा अनिल मुगुटकर, सौ. शैलजा नितीन मुगुटकर, व सौ. मीरा धंपलवार (मुगुटकर ) यांनी आषाढी एकादशी निमित्ताने आळंदी ते पंढरपूर अशी तीन आठवड्यांची पायी वारी पुर्ण केली. आळंदी येथील श्री रंगनाथ महाराज गुरुजी यांच्या दिंडी सोबत पायी चालत पंढरपूर येथे वारकऱ्यांचे व महाराष्ट्राचे दैवत विठ्ठलाचे दर्शन घेतले.
आषाढी वारी ही एक वेगळाच अनुभव देणारी आहे. या पायी वारी मुळे जीवन सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. पंधरा लाख वारकरी भक्तांची माऊली दर्शनाची ओढ अलौकिक आहे. भक्तीचा महापुर येथे ओसंडून वाहत असतो. पायी वारीचा हा अद्भुत सोहळा सर्वांना प्रपंचा पासुन दुर नेऊन पारमार्थिक आनंद देणारा आहे असे अनुभव कथन त्यांनी केले.
विठुरायाचे मनभरून दर्शन घेऊन आज स्वगृही सुखरुप आगमन होताच मुगुटकर परीवारातर्फे फटाके फोडून तर सर्व नातवंडांनी दिंडीचा देखावा सादर करुन त्यांचे आगळेवेगळे जोरदार स्वागत केले.