जिल्हा मासिक चर्चा व प्रक्षेत्र भेटीअंतर्गत पिकांची पाहणी — लोहा तालुक्यात जिल्हा कृषी अधिक्षक कळसाईत यांची भेट

जिल्हा मासिक चर्चा व प्रक्षेत्र भेटीअंतर्गत पिकांची पाहणी — लोहा तालुक्यात जिल्हा कृषी अधिक्षक कळसाईत यांची भेट
प्रतिनिधी, एकमुख न्यूज | www.ekmukh.com
लोहा (प्रतिनिधी) — जिल्हा मासिक चर्चा व प्रक्षेत्र भेटीअंतर्गत जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा तालुक्यातील विविध गावांतील पिकांची पाहणी करण्यात आली. सायाळ, दापशेड, बेरळी, लोहा, बेनाळ, रायवाडी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.
सायाळ येथील प्रगतशील शेतकरी रत्नाकर पाटील ढगे यांच्या शेतात लागवड केलेल्या सोयाबीन व कपाशी पिकाचे निरीक्षण कृषी शास्त्रज्ञांनी केले. तसेच दापशेड येथील नैसर्गिक शेती करणारे शेतकरी विश्वनाथ होळगे यांच्या शेतीतील तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचे कौतुक करण्यात आले. या दौऱ्यात सायाळ येथे पारडी येथील महिला शेतकरी गटाने उपस्थित अधिकाऱ्यांसमोर ‘दशपर्णी अर्क’ तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. जैविक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढवावा, यासाठी उपयुक्त मार्गदर्शनही देण्यात आले. पिकांची सखोल पाहणी करताना कृषी विज्ञान केंद्र, कापूस संशोधन संस्था आणि जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये मुख्यत: ▪️ जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाईत, ▪️ उपविभागीय कृषी अधिकारी अनिल शिरफुले, ▪️ कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे चव्हाण, ▪️ ना. कृ. वि. परभणीचे सूर्यवंशी, ▪️ किटकशास्त्रज्ञ बेंद्रे, ▪️ कृषी अधिकारी विकास नारनाळीकर (देगलूर), ▪️ गुडूप (बिलोली), नायगावचे बालाजी बच्चेवार, ▪️ भोकरचे दिलीप जाधव, ▪️ हदगावचे सदा पाटील, ▪️ उमरीचे शिवाजी मिराशे, ▪️ हिमायतनगरचे बंदेल,
▪️ अर्धापूरचे बिराडे, ▪️ मुदखेडच्या गच्चे मॅडम, ▪️ माहूरचे यलपडवाड, ▪️ कंधारचे माधव गुट्टे यांचा सहभाग होता. तसेच लोहा तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपेलवार, मंडळ कृषी अधिकारी दशरथ शिंदे, कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण हंडे, अनिल वडजे, कापशीकर, जोधळे, देशमुख, कोपनर मॅडम, यांच्यासह विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकरी रत्नाकर पाटील ढगे, संभाजी मामा ढगे, व्यंकटराव ढगे, अच्युतराव ढगे, उत्तम ढगे, ओम भालके, ज्ञानोबा येवले, चांदू जामगे यांची उपस्थिती लक्षणीय होती.
पारडी येथील महिला शेतकरी गटाचाही विशेष सहभाग या बैठकीत पाहायला मिळाला. या प्रक्षेत्र भेटीद्वारे विविध गावांतील शेतीत वापरली जाणारी नविन तंत्रे, नैसर्गिक शेती पद्धती व जैविक उपाय याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
ही जिल्हास्तरीय अभ्यासपूर्ण भेट लोहा तालुक्यातील शेतीला दिशा देणारी ठरली.
प्रतिनिधी, एकमुख न्यूज
www.ekmukh.com