Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशालेय शिक्षण व क्रीडासरकारी योजनासामाजिक कार्य
जिल्हा परिषद नांदुसा प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा.

नांदेड प्रतिनिधी – दि.21 जून 2025
जिल्हा परिषद नांदुसा प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा. करा योग रहा निरोग शाळेच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी नांदेड चे योगाचार्य श्री. सिताराम सोनटक्के तसेच त्याची टिम मधील रामरावजी जनकवाडे,सौ.उज्वलाताई जनकवाडे,सौ.उषिताई गैनवाड,सौ.मिराताई कोमलवाड,श्री. दिगंबर कल्याणे, सौ.उज्वला ताई कल्याणे, सौ.संध्याताई पेठकर यांच्या सहकार्यातून योगदिन साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिन व त्याचे महत्व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पऊळ सरांनी सांगितले, सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती फुलारी मॅडम यांनी केले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक , शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शाळेतील जेष्ठ शिक्षिका पोवार मॅडम यांनी केले.