जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये चमकले जिल्हा परिषद मानवत हायस्कूलचे खेळाडू
जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये चमकले जिल्हा परिषद मानवत हायस्कूलचे खेळाडू
मानवत प्रतिनिधी
दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला मानवत च्या भव्य क्रीडांगणावर सदरील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील 17 वर्षाखालील, 19 वर्षाखालील मुले व मुली या विविध वयोगटात खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
उद्घाटन कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद प्रशाला मानवत च्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया गायकवाड तर उद्घाटक म्हणून मानवत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एम.टी चव्हाण उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा टेनि क्वाईट संघटनेचे सचिव कृष्णा कवडे, मानवत केंद्राचे केंद्रप्रमुख उमाकांत हाडोळे, जिल्हा परिषद प्रशालेच्या शा. व्य.समितीचे अध्यक्ष असद खाॅन, उपाध्यक्षा संगीता अवचार मॅडम,अर्जुन वाघमारे, संजय पत्रिके, मानवत तालुक्याचे क्रीडा संयोजक किशन भिसे, रेंगे सर, सुनील चौधरी, आनंद भिसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती तूपसमिंद्रे यांनी तर आभार प्रदर्शन शेख मुजीब यांनी केले. एकूण 26 संघाने या स्पर्धेमध्ये आपले सहभाग नोंदवला .
सदरील स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्रशाला मानवत च्या 14 17 व 19 वर्षाखालील मुलांच्या गटात तिन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले. तसेच 19 व 14 वर्षाखालील मुलींच्या गटात द्वितीय स्थान मिळवले.
व 17 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावले. सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक शेख मुजीब यांचे मार्गदर्शन लाभले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा परिषद प्रशाला मानवत च्या खेळाडूंचे चे सर्वत्र कौतुक होत आहे.