जामदरी टेकडी येथे साधना भवनाचे उद्घाटन
जामदरी टेकडी येथे साधना भवनाचे उद्घाटन
***************
भोकर( तालुका प्रतिनिधी) महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती चे औचित्य साधून जामदरी टेकडी येथे साधना भवनाचे उद्घाटन 2 ऑक्टोबर 2024 रोजी चैतन्य महाराज कोंडदेव आश्रम महंत प्रभाकर बाबा कपाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
भोकर तालुक्यातील मौजे जामदरी येथे तुकारामजी दादा गीताचार्य यांनी 1978 साली ध्यान योग साधना शिबिर घेतले होते त्यावेळी लक्ष्मणदास शास्त्री महाराज यांनी प्रारंभी तिथे साधना सुरुवात केली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची पेरणी तालुक्यातील गावा गावांमध्ये केली काही वर्षाच्या कालखंडानंतर तेथील कार्य थांबलेले होते निर्मलाताई खडतकर यांनी त्या पावन भूमीचा जीर्णोद्धार करण्यासाठी व तिथे बांधकाम करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले गुरुदेव प्रेमी मंडळींच्या आर्थिक मदतीने तिथे साधना केंद्र उभारण्यात आले 2 ऑक्टोबर रोजी साधना केंद्राचा जीर्णोद्धार आणि उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी ज्ञानेश्वर महाराज केसाळे यांचे कीर्तन झाले त्यानंतर महंत प्रभाकर बाबा कपाटे, चैतन्य महाराज कांडली, जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब बराटे, डॉ. बालाजी कोंम्पलवार, सुभाष पाटील कोळगावकर, निर्मलाताई खडतकर, आदींनी आपले मनोगत व्यक्त करून या ठिकाणी साधना करण्यासाठी आपल्या मुला मुलींना सुसंस्कारित बनण्यासाठी पाठवावे असे आवाहन केले या कार्यक्रमास शेषराव पाटील, उत्तमराव दिवशीकर, गोपाळ महाराज मुरझळेकर ,गोविंदराव पाटील, संभाजी आलेवाड, बालाजी पा. कोळगावकर, बापूराव पा. सोनारीकर, बालाजी सरसे, रघुनाथ माचेवार, प्रकाश मामा कोंडलवार, नर्मदा ताई, सुनिता ताई बाभळीकर ,भारत अंभोरे, गजानन पाटील, लक्ष्मण पा. बाभळीकर, निरंजन भाऊ, गंगाप्रसाद बाशेट्टी यांच्यासह गुरुदेव प्रेमी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते जामदरी येथील ग्रामस्थ व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला