छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल, तणाव निवळला.
छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल, तणाव निवळला.
वसमत प्रतिनिधी | दिनांक १५ सप्टेंबर संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास येथील भाजी बाजारात आरोपीने एका तरुणी सोबत लज्जास्पद वर्तन केले. या प्रकरणी सदर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सदरील महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली असता सोबतच्या तरुणांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांचा वाद झाला व प्रकरण चिघळले.
श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत मोठा जमाव पोलीस स्टेशन समोर जमला व घोषणाबाजीला सुरूवात झाली. यावेळी पोलीस निरीक्षक श्री वाघमारे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील हिंगोली येथुन तातडीने वसमत मध्ये दाखल होत परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. आरोपीला अटक केली असून दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन उपस्थितांना देत जमावाला शांत केले.
सदरील घटनेची माहिती देताना आरोपीवर बीएनएस कलम ७४ व ७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल तसेच नागरिकांनी शहरातील शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. उपविभागीय पोलीस श्री थोरात व पोलीस निरीक्षक श्री कुंदनकुमार वाघमारे यावेळी उपस्थित होते.