छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त उदगीर येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त उदगीर येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न
उदगीर प्रतिनिधी : रयतेचे राजे, बहुजनप्रतिपालक, अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांच्या विचारांना वंदन केले.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये चंद्रशेखर मोहिते सर, विजयकुमार चवळे, शिवशंकर पाटील, प्रशांत भाऊ जगताप, अॅड. भाऊसाहेब जांभळे, अॅड. कनिष्क शिंदे, बाबासाहेब सूर्यवंशी, धनराज जाधव, नारायण भोसले, विजय बामणीकर, सचिन पाटील, बालाजी व्यंकोने, सतीश पाटील मानकीकर, पंकज कालानी, बालाजी नादरगे, वाडकर गुणवंत, शिवाजी मोहिते, ऋषिकेश मुळे, अमर कांबळे (दावनगाव), शिवाजी पकोळे, डी. एस. बिरादार सर यांचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. शिवरायांचे राज्यकारभार, स्वराज्य स्थापनेसाठी त्यांचे योगदान आणि लोककल्याणकारी धोरणे या विषयांवर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले.
शिवरायांच्या प्रेरणादायी कार्यातूनच समाजात एकात्मता आणि न्याय प्रस्थापित होऊ शकतो, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचे पालन करत समाजहितासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाची सांगता “जय भवानी, जय शिवाजी!” या घोषणांनी झाली.