सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रसामाजिक कार्य

चालकाच्या स्टेअरिंगला प्रामाणिकपणाची दिशा विसरलेले दागिने परत करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ

चालकाच्या स्टेअरिंगला प्रामाणिकपणाची दिशा विसरलेले दागिने परत करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ

उदगीर-प्रतिनिधी उदगीर आगाराच्या एसटी बसचे चालक शरद नीला यांच्या प्रामाणिकपणामुळे एका महिलेस बसमध्ये विसरलेले साडेपाच लाख रुपयांचे दागिने परत मिळाले.यासाठी या चालकाला तब्बल १० ते१२ कि. मी.दुसऱ्या बसचा पाठपुरावा केला.
शिर्डी येथील बसस्थानकाच्या फलाटावर शिर्डीहून उदगीरकडे निघण्यासाठी मंगळवारी उदगीर आगाराची बसगाडी उभी होती. या बसमध्ये राहुरी येथे लग्नाला जाण्यासाठी एक महिला प्रवासी बसली होती. तेव्हा ही बस निघण्यापूर्वी शिर्डी-पंढरपूर बस लागल्याने ती प्रवासी महिला घाईघाईन या बसमधून उतरली. मात्र, त्यावेळी तिला आपली पर्स उदगीरकडे जाणाऱ्या बसमध्ये विसरल्याचे लक्षात आले नाही. पर्समध्ये पाच लाख रुपयांचे पाच तोळे सोन्याचे दागिने, दहा हजारांची रक्कम ठेवलेली पर्स बसमध्येच विसरली.
दरम्यान, उदगीर आगाराचे चालक शरद गणपतराव निला (रा. कबनसांगवी, ता. चाकूर) यांना बसमध्ये महिला प्रवासी पर्स विसरल्याचे लक्षात आले. व ती प्रवाशी महिला शिर्डी -पंढरपूर बसमध्ये गेल्याचे प्रत्यक्षदर्शनी प्रवाशांनी लक्षात आणून दिल्यानंतर चालक निला यांनी
उदगीर बसच्या अगोदर सुटलेल्या शिर्डी -पंढरपूर बसचा १०ते १२ कि. मी. पाठलाग करून ती दागिने असलेली पर्स
महिला प्रवाशाला परत केली. दरम्यान आपली पर्स विसरल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने या बसमध्ये टाहो फोडला होता.दरम्यान चालक निला यांनी पुढे धावणारी बस गाठून राहता बसस्थानकात सदर प्रवासी महिलेला वाहतूक नियंत्रण कक्षात बोलावून कक्षाधिकारी किरण राऊत यांच्या समक्ष चालक शरद निला यांनी पर्स महिलेच्या ताब्यात दिली. यावेळी शिर्डी -पंढरपूर बसचे चालक गणेश लांडगे व वाहक पांडुरंग केसकर उपस्थित होते. यानिमित्त चालक निला यांचा राहता बसस्थानकात सत्कारही करण्यात आला.
विशेष म्हणजे, महिलेने देऊ केलेली बक्षिसाची रक्कमही चालक नीला यांनी कर्तव्यभावना व्यक्त करत नाकारली.

प्रामाणिकपणा हीच महामंडळाची ओळख —!
उदगीर आगाराचे चालक शरद निला यांच्या प्रामाणिकपणामुळे एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक भाव पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. प्रवाशांना सेवा देतानाच त्यांच्या वस्तुंची काळजी घेऊन व त्यांना परत करून चालक-वाहकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक आहे.
चिन्मय चिटणीस, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, उदगीर बस आगार .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button