आपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणशेती विषयी
गायरान जमिनी कसणाराच्या नावे करण्याची शेतमजुरांची मागणी आमदार वरपूडकरांना दिले निवेदन
गायरान जमिनी कसणाराच्या नावे करण्याची शेतमजुरांची मागणी आमदार वरपूडकरांना दिले निवेदन
मानवत तालुका प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील कसत असलेल्या गायराण जमिनी कसणाराच्या नावे करण्यात याव्यात यासाठी शासन दरबारी आवाज उठवावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने मंगळवारी ता २५ आमदार सुरेश वरपूडकर यांच्याकडे करण्यात आली . यावेळी संघटनेचे अशोक बुरखुडें , लिंबाजी धनले , रामराजे महाडिक , रामकृष्ण शेरे पाटील , अनंत भदर्गे , अनिल जाधव , डि एम झोडपे , नंदकुमार लांडगे , नारायण लांडगे , दता श्रीपती , पार्वतीबाई जाधव , लक्ष्मीबाई जाधव ,बन्सी सोनकांबळे , शांताबाई शिवाजी , उत्पम सुर्यवंशी , गिताराम तुपसमुद्रे मुंजाजी सोनटक्के , आश्रोबा तुपसमुद्रे , दत्ता तुपसमुद्रे , महादेव तुपसमुद्रे , गोपीनाथ तुपसमुद्रे , हरीभाऊ गायकवाड , एकनाथ हरबडे उपस्थीत होते .