गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश : नांदेड तालुक्यातील 160 विद्यार्थी एनएमएमएस मध्ये पात्र

गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश : नांदेड तालुक्यातील 160 विद्यार्थी एनएमएमएस मध्ये पात्र
नांदेड, प्रतिनिधी : पारसेवार
नांदेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यंदाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आदरणीय गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रभावी नियोजन व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तालुक्यातील तब्बल 160 विद्यार्थी पात्र ठरले असून शिक्षण क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांचा सराव व्हावा म्हणून त्यांनी प्रत्येक केंद्रातून केंद्रस्तरावर जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन प्रत्येक केंद्रातून निवडक 10 नावे तालुकास्तरावर मागून घेतली आणि अशा 90 विद्यार्थ्यांची दर सोमवारी एक चाचणी याप्रमाणे जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी चाचणी घेऊन विद्यार्थ्यांचा सराव घेण्यात आला सदर चाचणीसाठी 90 विद्यार्थ्यांना स्वनिर्मित प्रश्नपत्रिका तयार करून व मुख्य चाचणी होते त्याप्रमाणे उत्तरपत्रिका ची सुद्धा निर्मिती करून त्यांनी चाचणी घेऊन त्याच दिवशी तपासून तपासण्यात आली जे तीन विद्यार्थी टॉपचे मार्क घेऊन उत्तीर्ण झाले अशा तीन विद्यार्थ्यांना त्याच दिवशी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं व त्यांचे मनोगत घेऊन दुसऱ्या विद्यार्थ्यां त्यांना प्रोत्साहित करून अशा सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण घ्यावेत म्हणून प्रोसेस करण्यात आले एनएमएमएस ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची व शैक्षणिक गुणवत्तेची कसोटी मानली जाते. या पार्श्वभूमीवर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध तयारीवर भर दिला होता. तालुक्यात विविध शाळांमध्ये मार्गदर्शन वर्ग, सराव चाचण्या, प्रश्नपत्रिका विश्लेषण, शंका निरसन सत्रे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आले.

मुख्याध्यापक व विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देऊन वैयक्तिक मार्गदर्शन केले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या जिद्दीने तयारी करून यश मिळविले. पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हा भक्कम निकाल लागल्याची भावना शिक्षकवर्गाने व्यक्त केली.
या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक केले. भविष्यातही तालुक्याचा निकाल अधिक उंचावण्यासाठी अशाच प्रकारचे गुणवत्तावर्धन उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नांदेड तालुक्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यात तालुक्याची शैक्षणिक प्रतिमा अधिक बळकट झाली असून सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.















































