खो खो पंचांनी राज्यस्तरीय तांत्रिक मार्गदर्शन शिबिरात सहभागी व्हावे – श्री शिवदास बोड्डेवार
खो खो पंचांनी राज्यस्तरीय तांत्रिक मार्गदर्शन शिबिरात सहभागी व्हावे – श्री शिवदास बोड्डेवार
वसमत प्रतिनिधी – महाराष्ट्र खो खो असोसिएशन व हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 यावर्षी चे राज्यस्तरीय खो खो पंच शिबिर दि. 27 व 28 जुलै 2024 रोजी, मयूर मंगल कार्यालय, वसमत जि. हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे. सदरील शिबिरात खो खो पंच, संघटना पदाधिकारी, खेळाडू यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवदासजी बोड्डेवार यांनी केले आहे.
आमदार श्री राजु भैय्या नवघरे यांना निमंत्रण देताना पदाधिकारी.
दोन दिवस चालणाऱ्या पंच शिबिराचे उद्घाटन दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता हिंगोली विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. तानाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली, वसमत विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री.राजूभैया नवघरे यांच्या शुभहस्ते, महाराष्ट्र खो खो असोसिएशन चे सरचिटणीस प्रा.डॉ.श्री. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. राजेश्वर मारावार, डॉक्टर्स असोसिएशन वसमत चे अध्यक्ष डॉ.एम.आर. क्यातमवार, वसमत नगरपरिषद माजी उपाध्यक्ष श्री. सिताराम म्यानेवार, युवासेना तालुका प्रमुख उबाठा श्री. कन्हैया बाहेती, माऊली पतसंस्था वसमत, अध्यक्ष श्री. बाळासाहेब कोसलगे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितत पार पडणार आहे.
या राज्यस्तरीय खो खो पंच शिबिरासाठी राज्यातील 24 जिल्ह्यातील जवळपास 300 पंच व राज्य खो खो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामध्ये खो खो खेळाविषयी विविध चर्चा सत्रे आयोजित केली जाणार असून, नवीन पंचाना नियमाबाबतीत असणारी अस्पष्टता दूर केली जाणार आहे. यात स्लाईड शो, पुर्वीच्या सामन्यातील चलचित्रे, गुणपत्रक दाखवून त्यातील निर्णयाबाबत देखील चर्चा करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय खो खो पंच शिबिराचा समारोपीय कार्यक्रम पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा.आमदार श्री. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कळमनुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. संतोष बांगर, महाराष्ट्र खो खो असोसिएशन सरचिटणीस प्रा.डॉ.श्री. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ.उज्वलाताई तांभाळे , कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत, सभापती श्री. तानाजी बेंडे, रामदास पाटील (सुमठाणकर), श्री. सुनिलभाऊ काळे, उबाठा उपजिल्हा प्रमुख, श्री. सुभाष लालपोतू अध्यक्ष व्यापारी महासंघ, श्री. राजूदादा चापके शिवसेना तालुका प्रमुख, अजगर पटेल फुटबॉल असोसिएशन, महाराष्ट्र प्रतिनिधी, या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित पार पडणार आहे.
सदर राज्यस्तरीय खो खो पंच शिबिरासाठी संयोजन समिती, भोजन समिती, स्वागत समिती, निवास व्यवस्था समिती, प्रसिद्धी समिती आदी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो असोसिएशन अध्यक्ष तथा शिवेश्वर नागरी सहकारी बँक वसमतचे अध्यक्ष श्री शिवदास बोड्डेवार, जिल्हा खो खो असोसिएशन उपाध्यक्षा सौ.मनीषा काटकर, उपाध्यक्ष श्री. प्रशांत सोनी, महाराष्ट्र खो खो असोसिएशन तांत्रिक समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो असोसिएशन चे सचिव प्रा.डॉ.श्री. नागनाथ गजमल सर, प्रा डॉ अनिल मुगुटकर, शिवाजी कट्टेकर, अमोल मुटकुळे, मिनानाथ गोमचाळे, प्रवीण शेळके, नाना शिंदे, मारोती अलकटवार, मनोज टेकाळे हे प्रयत्न करत आहेत. शहरातील क्रिडाप्रेमी नागरिक, खेळाडू यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.