क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धा संपन्न
वसमत…… प्रतिनिधी. येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात ग्रंथालय विभागा तर्फे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमा अंतर्गत व आज दि. 3 जानेवारी 2025 रोजी ठीक 11:30 वाजता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धचे व तसेच शिवचरित्रकार श्री. निवृती गजानन गिरी यांचे व्याख्याना चे आयोजनकरण्यात आले होते.
या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एम.जाधव, प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शिवचरित्रकार श्री. निवृत्ती गजानन गिरी, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाबुराव खंदारे, हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष क्षीरसागर, व तसेच कार्यक्रमाच्या संयोजिका ग्रंथपाल डॉ. सविता आवचार मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शेख रजिया शहेनाज मॅडम यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली वकृत्व स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रमुख पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर माहिती दिली. प्राचार्य डॉ. एम.एम.जाधव सरांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची सखोल माहिती दिली.
वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुभाष शिरसागर सर व मराठी विभाग प्रमुख डॉ. बाबुराव खंदारे सर यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षण केले. स्पर्धकांमधून कनिष्ठ महाविद्यालयाचे तीन व वरिष्ठ महाविद्यालयाचे तीन असे विद्यार्थी विजेते म्हणून घोषित करण्यात आले. आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी सुरज सरोदे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ/ कनिष्ठ प्राध्यापक वर्ग विद्यार्थि /विद्यार्थ्यांनी सर्वांजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रंथालयातील कर्मचारी श्री. पंडीत गोरे,श्री. शिवाजी कदम, श्री. एकनाथ कदम, श्री. अंजेश फोपसे, श्री. अविनाश सोनवणे,श्री. राजु गुंजकर, श्रीमती रेणुका मगर, राधा कदम,
अवंतिका शिंदे या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.