कोल्हापुरात ग्राहक समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर
तानाजीराव गुंड यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण

कोल्हापुरात ग्राहक समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर
तानाजीराव गुंड यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर येथे ग्राहक समितीच्या कार्यकारिणी निवडीसाठी बैठक पार पडली. या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश अध्यक्ष श्री. तानाजीराव गुंड यांनी सर्व नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
नवीन कार्यकारिणीत सौ. रोहीणी अमोल पराडकर यांची प्रदेश महिला अध्यक्षा, श्री. राजू मडीवळय्या कंटीकर यांची करवीर तालुका अध्यक्ष, श्री. चंद्रकांत वाकरेकर यांची करवीर तालुका उपाध्यक्ष, श्री. सुकुमार पाटील यांची प्रदेश संघटक, श्री. मुस्ताक मेस्त्री यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, श्री. मनोहर लोहार यांची प्रदेश उपाध्यक्ष, श्री. दगडू (आप्पा) खोत यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, श्री. रमेश रेवणकर यांची शहर अध्यक्ष, श्री. रोशन भालेकर यांची युवक जिल्हा अध्यक्ष, सौ. मेघा क्षीरसागर यांची प्रदेश महिला उपाध्यक्षा, सौ. अपर्णा पाटील यांची शहर महिला अध्यक्षा आणि सौ. वंदना घाटे यांची पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा म्हणून निवड झाली.
या कार्यक्रमास कार्यकर्ते श्री. अमोल पराडकर यांची उपस्थिती होती. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकजूटीनं कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.