कोलकत्ता घटनेच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा
कोलकत्ता घटनेच्या निषेधार्थ महिलांचा मोर्चा
मानवत प्रतिनिधी
पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता येथील मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचार व खुनाच्या निषेधार्थ शनिवारी ता १७ मानवतला डॉक्टर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोर्चा काडून तहसील प्रशासनाला निवेदन दिले .
दुपारी ४ वाजता शहरातील नगरपालिकेपासून मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला . या मोर्चात शहरातील विविध महिला मंडळाच्या पदाधिकारी काळ्या फिती बांधून सामील झाल्या होत्या . यावेळी तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी श्री नागरगोजे यांना निवेदन देऊन मयत महिला डॉक्टरला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
मोर्चात डॉ प्रिया राठी , डॉ शरयू खेकाळे , डॉ मनीषा गुजराथी , डॉ वर्षा वाघमारे , डॉ माधुरी काळे , डॉ देवयानी दहे , मीनाताई देशमुख , डॉ प्रणिता कदम , डॉ प्रतिभा तोडकरी , डॉ अनिता इक्कर , जयश्री देशमुख , कीर्ती कत्रुवार , ममता काबरा , सारिका अग्रवाल , समीक्षा अग्रवाल , सीमा लाहोटी , मेघा तापडिया, शिल्पा मानधणी , माधुरी दलाल , कोमल चांडक , शीतल मंत्री , संगीता कडतन , लीना शर्मा , श्वेता चांडक , प्रतिभा पवार , योजना जोशी , सीमा गऊल , अश्विनी बेले , समीक्षा अग्रवाल , सायली राठी , पायल वाघमारे , मायावती वाव्हळे , तेजस्विनी वाव्हळे , गीता भाग्यवंत , विहा कत्रुवार , रेखा पंचारिया , कविता दायमा , वैष्णवी डोके , सायली कुलकर्णी , मंजुषा चेवले आदीजण सामील झाल्या होत्या .