सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रकाव्य संग्रहकाव्य संमेलनचालू घडामोडीधार्मिक वार्तासंपादकीय लेकसामाजिक कार्य

कोण्ही लिहिले माहित नाही पण खूप सुंदर लिहेले एकवेळ आवश्य वाचा…

फुटका आरसा अन तुटका कंगवा
————-

ज्यांचं ज्यांचं वय आज
65 -70 च्या घरात आहे,
त्यांच्या स्वभावामध्ये
बराच संयम आहे.

कुठून आला हा संयम,
एवढी नम्रता कशी ?
अपमान पचवण्याची
ताकद आली कशी ?

या प्रश्नांची उत्तरं
जरूर तुम्हाला मिळतील,
जर तुम्हाला बालपणीचे
त्यांचे दिवस कळतील.

दारिद्र्य आणि गरीबी
घरोघरी होती,
अंग घासायला दगड
अन दाताला राखुंडी होती.

कशाचं बॉडी लोशन
अन् कशाचं Hair Gel,
हिवाळ्यात अंग उललं की
आमसुलाचं तेल.

तोंड पाहण्यासाठी नेहमी
फुटका आरसा असायचा
काचेच्या तुकड्यात एकतर
डोळा,नाहीतर कान दिसायचा.

सगळे दात असलेला कंगवा
कधीही मिळाला नाही,
अफगाण स्नोचा भाव आम्हाला
कधीच कळाला नाही.

चड्डी अन् सदऱ्याला
तांब्याची इस्त्री असायची,
न्याहारीला लोणच्यासोबत
शिळी भाकरी मिळायची.

कबड्डी , लंगडी , कोया
फ़ुकटे खेळ असायचे,
दोन्ही गुडगे फुटले तरी
पोरगे खूश दिसायचे.

कांद्याचे पोहे अन्
मुरमुऱ्याचा चिवडा,
पेढ्याचा तुकडा मिळाला की
आनंद आभाळाएवढा.

काजू ,बदाम यांच्याबद्दल
फक्त ऐकून होतो,
एखादा पाहुणा आला की
अंगणात नाचत होतो.

मोठ्या माणसांसमोर जायची
हिंमतच नसायची,
वडील बैठकीत असले की
पोरं ओसरीवर दिसायची.

आजकालच्या पोरांना हे
खरं वाटणार नाही,
आई वडिलांच्या गरीबीवर
विश्वास बसणार नाही.

म्हणून म्हणतो पोरांनो
आई वडिलांशी बोला,
काही नाही मिळालं तरी
आनंदाने डोला.

नसण्यातच मजा होती
मोठं झाल्यावर कळतं,
खरं शिक्षण माणसाला
गरीबीकडूनच मिळतं.

🌷गरीबी जवळून पाहिलेल्या माझ्या सर्व मित्रांना समर्पित..🌷

🌿 फुटका आरसा अन तुटका कंगवा 🌿

💖 जुने दिवस आठवले असतील, हृदयाला स्पर्श झाला असेल…
गरीबीतील आनंदाची ही आठवण जपून ठेवा!

🙏 आई-वडिलांची साथ असताना त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी बोला.
ही कविता तुम्हाला भावली असेल, तर नक्की शेअर करा आणि जुन्या आठवणींना उजाळा द्या!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button