के के एम महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी एम-सेट परीक्षेत उत्तीर्ण
के के एम महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी एम-सेट परीक्षेत उत्तीर्ण
मानवत: येथील के.के.एम. महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सावित्रीबाई फुले,पुणे विदयापीठ,पुणेच्या वतीने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एप्रिल -२४ मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत सन्मानजनक यश संपादीत केले.महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.यामध्ये गणित विषयात श्रीनिवास इटवाले, रसायनशास्त्र विषयात राधाकिसन जाधव, योगमाया निर्वाळ व सचिन राठोड,प्राणीशास्त्र विषयात गणेश लहाने व कला शाखेचा सोमनाथ चिंचकर यांचा समावेश आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात कार्यरत असलेल्या सौ.सविता घनवट यांनीही यश प्राप्त केले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पा.ता.शि.प्र.मंडळ संस्थेचे अध्यक्ष मा. विजयकुमारजी कत्रुवार, सचिव बालकिशनजी चांडक, सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के.जी. हुगे , अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रोफेसर दुर्गेश रवंदे, न्याक समन्वयक डॉ.कैलाश बोरुडे, डॉ.योगेश बागुल, डॉ.संदीप राठोड, डॉ.प्रदीप गिरासे , प्रा.अनिल कापसे व इतर सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.