किनी येथे अवैधरित्या देशी दारूची सर्रास विक्री
किनी येथे अवैधरित्या देशी दारूची सर्रास विक्री
***********
खाजगीरीत्या बोली लावून गावातच दिले जाते टेंडर
************
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याची डोळेझाक
************
(भोकर प्रतिनिधी : बी.आर.पांचाळ ) तालुक्यातील मौजे किनी येथे गेली अनेक वर्षापासून देशी दारू विक्रीचे टेंडर खाजगीरित्या बोली लावून गावातच दिले जाते सर्रास देशी दारूची विनापरवाना लायसन नसताना विक्री केली जाते मात्र उत्पादन शुल्क अधिकारी यामध्ये हात मिळवणी करून असल्याने अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर देशी दारू मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे.
शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना असलेल्या दुकानदारांनाच देशी दारू व विदेशी दारू विकता येते मात्र भोकर तालुक्यातील किनी येथे गेली अनेक वर्षापासून उत्पादन शुल्क विभागाचा परवाना नसताना अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर देशी दारूची विक्री केली जात आहे सदर देशी दारू विक्रीचे टेंडर अवैधरित्या विना परवाना गावातच दिले जाते 15 ते 18 लाख रुपयापर्यंत टेंडर बोलून सर्रास दारू विक्री केली जाते त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्या जात आहे.
उत्पादन शुल्क अधिकाऱ्याची मात्र डोळे झाक”
*************
अवैधरित्या देशी दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी नियंत्रण ठेवून कायदेशीर कारवाई करण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करतात ग्रामीण भागात हॉटेलवर व इतर ठिकाणी झाडे टाकून गुन्हे दाखल करतात मात्र भोकर तालुक्यातील किनी येथे सर्रास दुकान थाटून देशी दारूची दररोज अवैधरित्या विक्री केली जात असताना मात्र उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी डोळे झाक करून आहेत पोलीस यंत्रणा व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने किनी मध्ये देशी दारू विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे त्या ठिकाणी देशी दारू विक्रीचे लायसन नसताना विक्री कशी केली जाते उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कारवाई का करीत नाहीत पोलीस यंत्रणा त्याकडे का दुर्लक्ष करते शासनाचा महसूल बुडविला जातो त्यास जबाबदार कोण असे अनेक प्रश्न निर्माण होत असून किनी येथे होत असलेल्या अवैध देशी दारू विक्रीच्या दुकानावर धाड टाकून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे