काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्याचा साठा पकडला…
काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्याचा साठा पकडला…
नेवासा प्रतिनिधी– दिनांक 02/07/2024/ रोजी दुपारी 04.00 वा.चे सुमारास चिलेखनवाडी ता.नेवासा येथील नागरिकांनी नेवासा तहसीलदार संजय बिरादार यांना फोन करून माहिती दिली की,चिलेखनवाडी गावामध्ये स्वस्त धान्य दुकानातील शासकीय धान्याची चोरी करुन बाहेर पाठविण्यात येत आहे अशी नागरिकांनी माहिती दिल्याने तहसिलदार यांनी तात्काळ चिलेखनाडी येथील तलाठी अनंत लक्ष्मण विरकर यांना सदर ठिकाणी जावुन चौकशी करा असे आदेश दिल्याने ते सदर ठिकाणी गेले असता त्यांना तेथे एक लाल रंगाचा तीन चाकी पियागो ॲपे रिक्षा क्र.MH.16.AE.1065 नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय, चिलेखनवाडी जवळ अडवुन ठेवला होता व तेथे एक इसम उभा होता.त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने अनिल भिमा मोरे रा.शेवगाव असे असल्याचे सांगितले.सदर ॲपे रिक्षात पाहिले असता विविध कंपनीच्या प्लास्टीक च्या गोणीत गहु व तांदुळ धान्य आढळुन आले.त्याबाबत अनिल मोरे यास विचारले असता त्याने सांगितले की, सदरचा माल मी चिलेखनवाडी ता.नेवासा येथुन भरला आहे असे सांगितले. सदर ॲपे रिक्षाची पाहणी केली असता ॲपे रिक्षात 9 हजार 400 रुपये 10 गोण्या तांदुळ अंदाजे 400 किलो, 5 हजार 500 रुपये 5 गोण्या गहु अंदाजे 200 किलो असा एकूण
14 हजार 900 रुपये किमतीच्या धान्याच्या माल सापडला.
वरील शासकीय धान्य अनिल भिमा मोरे रा.ता.शेवगाव याचे ताब्यातील लाल रंगाचा तीन चाकी टेम्पो पियागो ॲपे रिक्षा क्र.MH.16.AE.1065 वाहनात मिळुन आल्याने त्याचा पंचनामा करुन तहसील कार्यालयात घेवुन आलो.तहसीलदार संजय बिरादार यांच्या आदेशावरून पुरवठा निरीक्षक सौ.वैशाली शिकारे यांच्या फिर्यादीवरून अनिल भिमा मोरे रा.ता.शेवगाव यांचे विरोधात जिवनावश्यक वस्तु विनीमय अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ढाकणे हे करत आहे.