कलकत्ता घटनेच्या निषेधार्थ मानवतला डॉक्टरांचा बंद
कलकत्ता घटनेच्या निषेधार्थ मानवतला डॉक्टरांचा बंद तहसीलदारांना दिले निवेदन
मानवत प्रतिनिधी
पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथे निवासी डॉक्टर डॉ मौमिता देबनाथ यांच्यावर बलात्कार करून झालेल्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ शनिवारी ता १७ मानवत तालुका डॉक्टर्स संघटनेच्या वतीने सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला . तसेच आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली .
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येथील डॉक्टरांनी एकत्रित येत जोरदार निदर्शने करून तहसील प्रशासनाचे प्रतिनिधी तलाठी श्री नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी मानवत डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अंकुश लाड , कार्याध्यक्ष डॉ सचिन कदम , सचिव डॉ सुशील नाकोड , उपाध्यक्ष डॉ सचिन चिद्रवार , डॉ रामकीशन ईक्कर , कोषाध्यक्ष डॉ विजयकुमार कहेकर , डॉ जितेंद्र वर्मा , डॉ राजकुमार लड्डा , डॉ वरूण सोमाणी , डॉ जुबेर खान , डॉ तुषार कोक्कर , डॉ हर्षद बाकळे , डॉ नामदेव लेंगुळे आदीजण उपस्थित होते .