ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आरक्षण यात्रेत सहभागी व्हा – चंद्रसेन पाटील
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आरक्षण यात्रेत सहभागी व्हा – चंद्रसेन पाटील
लोहा प्रतिनिधी : सध्या राज्यात ओबीसी आरक्षणाच्या विषयावरुन रणकंदन सुरु असुन, उपेक्षित घटकांच्या ओबीसी आरक्षणावर प्रस्थापित समाज घुसवण्याचे षडयंत्र रचले जात आहे, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आता बाळासाहेब आंबेडकर मैदानात उतरले आहेत, त्यांना खंबीर पाठींबा देण्यासाठी व ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी माळाकोळी येथे ओबीसी आरक्षण यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात आरक्षण विषयावरुन वातावरण गढुळ करण्याचे काम केले जात आहे, ओबीसी नेत्यांना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करून सोशल मीडियावर लिहिले जात आहे, राजकीय खच्चीकरण केले जात आहे, याशिवाय ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसी आरक्षण संरक्षणासाठी ठामपणे उभे राहिले आहेत, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे ओबीसी समाज मुख्य प्रवाहात आला, त्यांना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा मिळाली, राजकारणात ओबीसी समाज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मोठ्या पदावर कार्यरत आहे, आजही ओबीसी आरक्षण धोक्यात असताना बाळासाहेब आंबेडकर हेच संरक्षणासाठी उभे राहिले आहेत, त्यामुळे आपण ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला पाहिजे म्हणूनच ओबीसी आरक्षण यात्रेत ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजेअसे आवाहन चंद्रसेन पाटील यांनी केले आहे.
ओबीसी आरक्षण यात्रा ही २ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता माळेगाव येथे दाखल होत आहे तेथून रॅलीच्या माध्यमातून दुपारी २ वाजता माळाकोळी येथे सभा होणार आहे, त्यानंतर लोहा येथे स्वागत कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.