उदगीर शहरात जनावरे रस्त्यावर सोडल्यास आता भरावा लागणार दंड
उदगीर शहरात जनावरे रस्त्यावर सोडल्यास आता भरावा लागणार दंड
उदगीर प्रतिनिधी -उदगीर शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. शिवाय भर रस्त्यात अनेकदा या जनावरांची आपसातल्या भांडणांमुळे अनेक वाहनांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. यापुढे ही मोकाट जनावरे रस्त्यावर दिसल्यास त्यांच्या मालकास आता दंड भरावा लागणार आहे.
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर जनावरे सर्रासपणे वावरतांना दिसतात .त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो. शहरातून जाणाऱ्या लातूर रोड, नांदेड बिदर रोड, देगलुर रोड, जळकोट रोड या प्रमुख रस्त्यांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नेहमीच या मोकाट जनावरांचा वावर असतो. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून गाडी चालवायला अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आपल्या मालकीचे जनावरे यापुढे रस्त्यावर मोकाट थांबू किंवा फिरू देवू नये. जनावरे मालकाने जर याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचे जनावरे रस्त्यावर आढळून आल्यास त्यांना नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात टाकण्यात येवून मोठ्या जनावरास रु.१०००/- तर छोट्या जनावरास रु.५००/- दंड प्रती दिवस आकारण्यात येईल आणि तीन दिवसात जनावर दंड भरुन घेऊन न गेल्यास जनावरांचा लिलाव करण्यात येईल अथवा गो शाळेत पाठविण्यात येतील याची नोंद घेण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी सुंदर बोन्दर यांनी केले आहे.