उदगीर मध्ये प्रेस क्लबची स्थापना…
उदगीर मध्ये प्रेस क्लबची स्थापना…
उदगीर प्रतिनिधी : उदगीर तालुक्यामध्ये पत्रकार बांधवांनी जेष्ट पत्रकार बबन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत प्रेस क्लब उदगीरच्या अध्यक्षपदी प्रभूदास गायकवाड तर सचिव म्हणून बस्वेश्वर डावळे याची निवड करण्यात आली. प्रेस क्लब उदगीरच्या कार्याध्यक्षपदी सुधाकर नाईक तर उपाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड आणि कोषाध्यक्ष म्हणून शेख अझरोद्यीन तर सहसचिव श्रीकृष्ण चव्हाण सर्वांमध्ये यांच्या निवडी करण्यात आल्या, या बैठकीत प्रेस क्लबचे मार्गदर्शक म्हणून बबन कांबळे तर कायदेविषयक सल्लागारपदी अॅड श्रावणकुमार माने तर शेख इरफान व अरविंद पत्की यांच्या सर्वांमध्ये ठरविण्यात आले. प्रेस क्लब उदगीरचे सदस्य म्हणून महेश मठपती, संग्राम पवार, महादेव घोणे, अनिल जाधव, खिजर मुन्सी, मंगेश सुर्यवंशी, अशोक तोंडारे, बालाजी कसबे, सुनिल मादळे शंकर बोईनवाड, राम जाधव, सुनिल सुतार, यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आले. यावेळी प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष प्रभू दास गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.