उदगीर मतदार संघात ३लाख१४हजार मतदार २३मतदान केंद्र वाढले,मतदार संघात ३५९ मतदान केंद्रे
उदगीर मतदार संघात ३लाख१४हजार मतदार २३ मतदान केंद्र वाढले,मतदार संघात ३५९ मतदान केंद्रे
उदगीर — उदगीर (अ. जा.) विधानसभा मतदार संघात ३लाख१४हजार १९१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
उदगीर मतदार संघात यापूर्वी ३३६ मतदान केंद्र होते . १३५० मतदार संख्येच्या वर असलेले २३ मतदान केंद्राची विभागणी करुन २३ मतदान केंद्राची नवीन निर्मीती करण्यात आलेली आहे. २३ नवीन मतदान केंद्रापैकी उदगीर तालुक्यात १९ नवीन मतदान केंद्राची निर्मीती व जळकोट तालुक्यामध्ये ४ असे एकुण २३ मतदान केंद्राची निर्मीती करण्यात आलेली आहे. आता उदगीर मतदार संघात एकुण ३५९ मतदान केंद्राची संख्या झालेली आहे. उदगीर विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १६४०६० स्त्री मतदार – १५०११४ त्रतीयपंथी -१७ एकुण मतदार ३१४१९१ मतदारांची संख्या आहे.
महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. पात्र नवमतदारांची मतदार नोंदणी करून घेणे आणि विधानसभा निवडणुकी आधी राज्याची अद्ययावत मतदार यादी तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देशआहे. निवडणूक आयोगाने दि. ०१ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्रान्वये दि.०१.०७.२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा दुसरा कार्यक्रम पुन्हा सुधारीत केलेला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.०६.०८.२०२४ ते दि.२०.०८.२०२४ असा आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमा अंतर्गत दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत दि. १० ऑगस्ट २०२४ (शनिवार), दि. ११ ऑगस्ट २०२४ (रविवार), दि. १७ ऑगस्ट २०२४ (शनिवार) आणि दि. १८ ऑगस्ट २०२४ (रविवार) या चार दिवशी राज्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करणे बाबत निर्देश दिलेले आहेत. उपरोक्त निर्देशानुसार २३७ उदगीर मतदारसंघा अंतर्गत सर्व मतदान केंद्रावर दि. १० ऑगस्ट २०२४ (शनिवार), दि. ११ ऑगस्ट २०२४ (रविवार), दि. १७ ऑगस्ट २०२४ (शनिवार) आणि दि. १८ ऑगस्ट २०२४ (रविवार) या चार दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असून सदर शिबीरावेळी संबंधीत यादीभागाचे बी.एल.ओ. त्यांचे अधिनस्त यादी भागातील मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. सदर शिबीरांचा लाभ उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा व सदर कालावधीत जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचे अवाहन उदगीर चे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी केले आहे.