सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
उदगीर : बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार जन शक्ती; कामाचा आढावा देत उमेदवारांची अर्ज दाखल
उदगीर (प्रतिनिधी) उदगीरमध्ये प्रहार जन शक्ती पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषद संपन्न झाली. या बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद तेलंगे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. परिषदेत प्रहार जन शक्तीचे संस्थापक आणि नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर राबविलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी भाष्य करताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “बच्चुभाऊ यांनी राज्यभर जनआंदोलन, शैक्षणिक उपक्रम, आरोग्यविषयक मदत आणि गरीब-शेतकऱ्यांसाठी आंदोलनात्मक लढे दिले. त्याच कामाच्या धर्तीवर आम्ही उदगीरमध्येही जनतेची सेवा करण्यासाठी उभे राहत आहोत.”
पत्रकार परिषदेत प्रहार जन शक्ती पक्षाच्या सर्व उमेदवारांनी उदगीर नगरपरिषद निवडणुकीसाठी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केल्याची घोषणा केली.
यामध्ये— विनोद तेलंगे – प्रभाग क्रमांक 15 श्रीमती श्रीदेवी विजयकुमार खंदारे – प्रभाग क्रमांक 5 सविता अमित खंदारे – प्रभाग क्रमांक 19 योगेश सोपा – प्रभाग क्रमांक 14 —या सर्व उमेदवारांनी अधिकृतरीत्या अर्ज दाखल केले आहेत.
तसेच प्रहार जन शक्ती पक्षाच्या नगराध्यक्ष पदासाठी शेख निलोफर शहाजहान यांची उमेदवारी निश्चित असून त्यांनीदेखील अर्ज दाखल केला आहे.
यावेळी शहाजान शेख यांनी “महाशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत उदगीरमध्ये रंगणार असून बच्चुभाऊंच्या कार्यपद्धतीप्रमाणे जनतेच्या प्रश्नांवर सरळ, स्पष्ट आणि ठोस भूमिका घेऊ,” असे सांगत जनतेला समर्थनाचे आवाहन केले.