उदगीर : नगरपरिषद निवडणूक 2025 – काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन; पक्ष नेत्यांची मोठी उपस्थिती

उदगीर : नगरपरिषद निवडणूक 2025 – काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन; पक्ष नेत्यांची मोठी उपस्थिती
उदगीर प्रतिनिधी : उदगीर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तयारीला वेग आला असून काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला काँग्रेस व सहयोगी नेतृत्वाची मोठी उपस्थिती लाभली.

उद्घाटन प्रसंगी माननीय खासदार शिवाजीराव काळगे, काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय दादा साळुंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस कल्याणजी पाटील, नगरपरिषद निवडणुकीचे निरीक्षक रवींद्रजी काळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोषजी बिरादार, तसेच शहराध्यक्ष मंजूर खान पठाण यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात उदगीर शहरासाठी पक्षाच्या निवडणूक रणनीतीवर चर्चा होत असून स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत जनतेशी संवाद वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि नियोजनपूर्वक प्रचार मोहीम राबवावी, यावर सर्व नेत्यांनी भर दिला.
उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्रभावीपणे झुंज देणार असल्याचे चित्र दिसत आहे.













































