सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

उदगीरमध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य बक्षीस वितरण सोहळा

उदगीरमध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य बक्षीस वितरण सोहळा

उदगीर, २८ मार्च २०२५ – सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती, उदगीरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य पारितोषिक वितरण समारंभ नगरपरिषद प्रांगण मैदान, उदगीर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्याला प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून राजेश्वरजी निटूरे सावकार, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, सिद्धेश्वर मुन्ना पाटील, मनोज पुदाले, सुधीर भोसले, मयूर बनसोडे, उदगीर ग्रामीणचे पी.आय. पुजारी, मधुकर एकुरकेकर, संतोष बिरादार, भास्कर पाटील, उदय मुंडकर, अंजुम कादरी, कुणाल बागबंदे, रामदास माळेगावे, सातबारा मेन्सचे विशाल दाडगे, कोनाळे कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी, विजयकुमार चवळे, विजयकुमार कप्पिकेरे, डॉक्टर विद्यासागर आचवले, दिपक नेत्रगावे, प्रशांत मागूळकर, राहुल रक्षाळे, नलगिरकर सर, मंजुषा कुलकर्णी, दिलीप हणमंते, आशा बेंजरगे, विनोद गुरमे, कनिष्क शिंदे, संगीता नेत्रगावे, केशव पाटील (माऊली मोबाइल शॉप), यशवंत बिरादार, महेश बिरादार, बसवराज स्वामी, आकाश इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी जोशी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

 

या भव्य सोहळ्यात उदगीर तालुक्यातील जवळपास २,००० विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविल्याबद्दल गौरविण्यात आले. तसेच ३७ शाळांच्या शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सोहळा उदगीर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरला आहे.

कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर, सतीश पाटील मानकीकर, बिपिन जयवंतराव पाटील, बाळासाहेब पाटोदे, प्रशांत जगताप, धनाजी मुळे यांनी केले. परीक्षक म्हणून अनिताताई कवठाळे, अशा मडके, स्वप्नाताई पुप्पलवाड, मीनाक्षीताई अंबोरो अतनुरे, रेश्माताई देशमाने, काव्या सचिनकुमार सोंत आंबेसंगे, मधुमती बिरादार, मंगला पाटील, नीताताई मोरे, मृदुलाताई पाटील, दत्तात्रय पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, पकोले रणजीत माळेगावे, विदेश पाटील सोमनाथपुरकर, पुनमताई सतीश उपरबावडे, संगमजी ऊपरबावडे, प्रा. मदन पाटील, प्रा. राहुल अतनुरे, डी. एस. बिरादार, निवृत्ती तिरकुमठे, ज्ञानेश्वर बिरादार, विजय बामणीकर, गणेश मुंडकर, शरद खोंडे, नामदेव सूर्यवंशी, अंकुश ताटपले पाटील, बालाजी नादरगे, पंकज कालाणी, अमोल पाटील, बामणे अंकुश, संतोष राठोड, राहुल बिरादार, विक्रम घोगरे, परमेश्वर मोरे, ॲड. भाऊसाहेब जांभळे, सार्थक केंद्रे, शंकर मोरे, गिरीधर पाटील, दिपक पाटील, गोपाळ पाटील दोरनालीकर, जयंत पाटील, हिमांशु पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय जिजाऊ, जय शिवराय” अशा घोषणा देत संपूर्ण वातावरण शिवमय केले. या सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे बीज रुजवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती, उदगीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button