भोकर मध्ये ग्यानमाता इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचा शुभारंभ

भोकर मध्ये ग्यानमाता इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचा शुभारंभ
**********
भोकर ( तालुका प्रतिनिधी) शारदा माता शिक्षण प्रसारक मंडळ भोकर संचलित शासन मान्यता प्राप्त ग्यानमाता इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचा शुभारंभ 15 जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
गंदेवार कॉलनी येथील भव्य अशा इमारतीत सर्व सोयी युक्त नर्सरी, एलकेजी, युकेजी व 1 ते 5 पर्यंतचे इंग्रजी शिक्षण या शाळेमध्ये दिले जाणार आहे 15 जून रोजी घेण्यात आलेल्या पालक मेळावा व शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. यू.एल. जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महंत परमेश्वर महाराज, बापूराव पाटील सोनारीकर, प्रकाश मामा कोंडलवार, दत्तात्रय पांचाळ, पत्रकार बाबुराव पाटील आदींची उपस्थिती होती प्रारंभी दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांच्या सत्कारानंतर संस्थाचालक बी.आर.पांचाळ यांनी प्रास्ताविक केले दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल गरीब होतकरू विद्यार्थ्यांना संधी देण्यात येईल अनुभवी शिक्षका मार्फत विद्यार्थ्यांना घडवले जाईल असे ते म्हणाले अध्यक्षीय समारोपात डॉ.यु.एल.जाधव यांनी संस्थेची यशस्वी वाटचाल घडावी, विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य तयार व्हावे असे मत मांडले उपस्थित मान्यवरांनीही यावेळी विचार मांडून शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमास सरपंच कामाजी पेन लोड, उपसरपंच गणेश दुमलवाड, हनमनलू बडगर, अवधूत राजुरे, दत्ता पाटील, मुख्य संस्थेच्या संचालिका सौ. महानंदा कदम, सौ.वनिता पांचाळ, सौ. मंगल राजुरे शिक्षिका सौ.अलका श्रीरामवार, सौ. अश्विनी महाजन, सौ. शामल तोंडरे, सौ. माया राचुटकर, प्रीती भवरे यांच्यासह सर्व पालक माता विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते