आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशालेय शिक्षण व क्रीडा

आहे ते स्वीकारून अप्रतिम बनवण्यासाठी प्रयत्न करा – श्री जयप्रकाशजी दांडेगावकर

आहे ते स्वीकारून अप्रतिम बनवण्यासाठी प्रयत्न करा – श्री जयप्रकाशजी दांडेगावकर

वसमत प्रतिनिधी – महाराष्ट्र खो खो असोसिएशन व हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 यावर्षी चे राज्यस्तरीय खो खो पंच शिबिर दि. 27 व 28 जुलै 2024 रोजी, मयूर मंगल कार्यालय, वसमत जि. हिंगोली येथे संपन्न झाले.
जे आहे ते स्वीकारून ते अप्रतिम बनवण्यासाठी प्रयत्न करा, यश तुमचेच आहे .तसेच या मोबाईल युगात खो खो सारख्या मैदानी खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे मनोगत श्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. आज राज्यस्तरीय खो खो पंच शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

दोन दिवस चाललेल्या खो खो पंच शिबिराचा समारोप आज संपन्न झाला. यावेळी कळमनुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. संतोष बांगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तुमचा खो खो आणि आमचा राजकारणातील खो खो खुप वेगळा आहे. त्यामुळे आमच्या खो चा तुम्ही उपयोग करु नका असा सल्ला यावेळी त्यांनी उपस्थितांना दिला. महाराष्ट्र खो खो असोसिएशन चे सरचिटणीस प्रा.डॉ. श्री. चंद्रजित जाधव यांनी दोन दिवसीय पंच शिबिराचा आढावा घेताना येथील ज्ञानाचा व माहितीचा पुढील स्पर्धांमध्ये पंचांना निश्चित उपयोग होईल असे प्रतिपादन केले. तसेच सुंदर आयोजन केल्याबद्दल हिंगोली जिल्हा खो खो असोसिएशनचे कौतुक केले.
पोर्णिमा सपकाळ व लावण्य मगर यांनी सहभागी पंच म्हणून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या पंच शिबिराचा खुप फायदा झाला असुन मनातील शंकांचे निरसन झाले असल्याचे तसेच भोजन व निवास व्यवस्था उत्तम होती असे त्यांनी सांगितले.
यावेळी खेळासाठी तन मन धन लावुन कार्य करणाऱ्या व कबड्डी आणि खो खो साठी जीवन समर्पित करणार्‍या वसमत शहरातील श्री हरीभाऊ रावळे सर, श्री निवृत्ती बांगर सर, श्री विरभद्र बेंडके सर व श्री अर्जुन सैदाने यांच्या कार्याचा विशेष गौरव करुन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत श्री सुभाष लालपोतु, श्री रामदास पाटील सुमठाणकर, सौ. उज्वलाताई तांभाळे, श्री सुनील भाऊ काळे, अजगर पटेल, श्री राजु दादा चापके, श्री मिलिंद यंबल, श्री भारत नामपल्ली यांच्या सह महाराष्ट्र खो खो असोसिएशन चे पदाधिकारी श्री. सचिन गोडबोले, श्री. गोविंद शर्मा, श्री. प्रशांत इनामदार, श्री पवन पाटील, श्री अविनाश सोनवणे, सौ वर्षा कच्छवा , श्री. संदीप तावडे, श्री प्रशांत पाटणकर, श्री नरेंद्र कुवर, श्री नानासाहेब झांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या राज्यस्तरीय खो खो पंच शिबिरासाठी राज्यातील 24 जिल्ह्यातील जवळपास 300 पंच व राज्य खो खो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व सहभागी प्रतिनिधींना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा डॉ अनिल मुगुटकर यांनी तर आभार प्रदर्शन हिंगोली जिल्हा सचिव प्रा डॉ नागनाथ गजमल यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर राज्यस्तरीय खो खो पंच शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा खो खो संघटनेचे अध्यक्ष तथा शिवेश्वर नागरी सहकारी बँक वसमतचे अध्यक्ष श्री शिवदास बोड्डेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खो खो संघटनेच्या उपाध्यक्षा मनीषा काटकर, उपाध्यक्ष प्रशांत सोनी, महाराष्ट्र खो खो असोसिएशन तांत्रिक समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो असोसिएशन चे सचिव प्रा.डॉ.श्री. नागनाथ गजमल सर, शिवाजी कट्टेकर, अमोल मुटकुळे, मिनानाथ गोमचाळे, बालासाहेब कोसलगे, प्रवीण शेळके, नाना शिंदे, सुरज शिंदे, चिरंजीवी कट्टा, मनोज टेकाळे, मयुर मेहता यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी खो खो खेळाचे पंच, मार्गदर्शक, प्रशिक्षक, पदाधिकारी, खेळाडू, पत्रकार व क्रीडाप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button