आर्य वैश्य महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी हरीश कत्रूवार तर सचिवपदी आशिष पेकम

आर्य वैश्य महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी हरीश कत्रूवार तर सचिवपदी आशिष पेकम
मानवत सौ ममता चिद्रवार : परभणी जिल्हा आर्य वैश्य महासभेच्या नूतन कार्यकारिणी च्या बिनविरोध निवडी संम्पन्न झाल्या असून अध्यक्षपदी हरिष कत्रूवार , सचिव आशिष पेकम, कोषाध्यक्ष सुशील मेडेवार, कार्याध्यक्ष स्वप्नील पद्दमवार यांची निवड करण्यात आली.
रविवारी ता 1 परभणी येथील आय एम ए च्या सभागृहात झालेल्या बैठकीचे अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष सुधीर पाटील तर समन्व्यक म्हणून राज्य संघटक प्रदीप कोकडवार, राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश पेकम, सखाराम चिद्रवार, सुनिल डाके व मावळते अध्यक्ष बालाजी डुब्बेवार हे उपस्थित होते.
प्रथम श्री वासवी माता व श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने बैठकीची सुरवात करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी गजानन कोकडवार जिंतूर, प्रसाद दमकोडे परभणी, ज्ञानेश्वर आय्या गंगाखेड, पांडुरंग रुद्रवार पालम, राजीव पामे पाथरी, दिलीप सतभाई सोनपेठ, मोहन कोत्तावार सेलू, वसंत पांपटवार पूर्णा तर सहसचिवपदी शिरीष मुक्तावार, महेश बासटवार, बालाजी माणिकवार, स्वप्नील येरमवार, केदार वलसेटवार, विकास गादेवार, सहकोषाध्यक्षपदी गजानन चिद्रवार, अनिल कवटीकवार, ज्ञानेश्वर डाके, गणेश रुद्रवार, सागर वट्टमवार, आकाश फुटाणे, दिलीप रुद्रवार यांची तर प्रोजेक्ट चेअरमन म्हणून विराज वट्टमवार, भूषण झरकर तर प्रसिद्धी प्रमुख महेश कोकड, डॉ सचिन चिद्रवार, प्रभाकर रेवणवार यांची संघटन प्रमुख म्हणून नारायण रेवणवार, योगेश मेडेवार,विधी सल्लगार अँड बिपीन पेकम यांची तर सल्लागारपदी नितीन वट्टमवार, संजय कोकडवार, राजेश्वर कत्रुवार, विशेष निमंत्रीत विकास वट्टमवार, कृष्णा पद्दमवार, डॉ रितेश वट्टमवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवड झालेल्या सर्व सदस्यांचे व
काशी अन्नपूर्णा सत्रम संस्थेवर सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर पेकम आणि राज्यस्तरावर बांधकाम समितीवर निवड झाल्याबद्दल किरण वट्टमवार, विशाल नारलेवार व संदीप नळदकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्कृती पद्दमवार तर आभार श्री रुद्रवार यांनी मानले.