आर्य वैश्य ऑफिशियल प्रोफेशनल असोसिएशन (AVOPA),कुमारी भक्ती गजानन येरमवार, श्री संजय बाबुराव पत्तेवार मुख्याध्यापक, व श्री रामेश्वर कोटलवार यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप…
आर्य वैश्य ऑफिशियल प्रोफेशनल असोसिएशन (AVOPA),कुमारी भक्ती गजानन येरमवार, श्री संजय बाबुराव पत्तेवार मुख्याध्यापक, व श्री रामेश्वर कोटलवार यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप…
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होकर्णा शाळेमध्ये आर्य वैश्य ऑफिशियल प्रोफेशनल असोसिएशन (AVOPA) यांच्यावतीने कुमारी भक्ती गजानन येरमवार, श्री संजय बाबुराव पत्तेवार मुख्याध्यापक, व श्री रामेश्वर कोटलवार व्यापारी यांच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्य वाटप म्हणून पाण्याच्या बॉटल्स श्रीमान नरेंद्र जी मेडेवार गटविकास अधिकारी जळकोट व श्रीमान डॉक्टर तानाजी चंदावर साहेब यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आल्या. गेल्या वीस वर्षापासून (AVOPA) च्या माध्यमातून सर्व सदस्य समाजातील गोरगरीब गरजूंना दरमहा धान्य व राशन किट वाटप करतात. गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मदतीचा हात (AVOPA) त्यांच्या जीवनास उभारी देण्याचे काम करतात.
आज पर्यंत ग्रामीण भागातील पन्नास शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप ए व्ही ओ पी ए च्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. याच माध्यमातून आज होकर्णा शाळेत स्वतः गटविकास अधिकारी श्रीमान नरेंद्रजी मेडेवार साहेब व श्रीमान डॉक्टर तानाजी चंदावार साहेब यांच्या शुभहस्ते बॉटल चे वाटप करण्यात आले.
शाळेच्या वतीने दोघांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ हवा यांनी केले तर आभार प्रदर्शन विजयकुमार तेलंग मुख्याध्यापक यांनी अहोपाचे पदाधिकारी प्रा डॉ दीपक चिद्दरवार संस्थापक अध्यक्ष, प्रा संजय चन्नावार अध्यक्ष, विजयकुमार गबाळे सचिव, प्रा राकेश पांपटीवार कोषाध्यक्ष व सर्व सदस्याचे आभार मानले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक मदत योजनेअंतर्गत आपणही वाढदिवस, लग्न वाढदिवस व इतर औचित्य साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी असे आव्हान विजयकुमार गबाळे यांनी केले आहे.
या प्रसंगी होकरणा गावचे सरपंच दामोदर जी बोडके ग्रामसेवक जाधव साहेब व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवशंकरजी डोणगाव विजयकुमार गोरे संजय शिवणगे बाबुराव धुळशेट्टे नागेश गोविंदवाड नवनाथ जाधव ग्रामस्थ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.