आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांना दिलेला शब्द पूर्ण – डॉ. अंकुश लाड

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांना दिलेला शब्द पूर्ण – डॉ. अंकुश लाड

मानवत / प्रतिनिधी

मानवत येथील आर्ट ऑफ लिव्हिंग च्या सर्व साधकाना त्यांच्या सोयीसाठी मानवत शहारत मोठे सभागृह उभारू असे अश्वशान डॉ अंकुश लाड यांनी १७ सप्टेंबर २०२२ रोजी दिले होते. तो दिलेला शब्द पूर्ण करीत ७ ऑक्टो रोजी शहरातील वाघेश्वर नगर परिसरात मानवत आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारासाठी २०० लक्ष रुपयाचे भव्य असे सभागृह बांधकामाचा शुभारंभ गुरूपूरजनेने करण्यात आला.
सद्या मानवत शहरात शेकडो साधक असून त्यांना दैनंदिन योग साधना व विविध शिबीर आणि भजन करण्यासाठी जागेची अडचण आहे. याकरीता आम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगसाठी जागा उपलब्ध करून देऊन सभागृह निर्माण करून द्यावे अशी मागणी केली.यावेळी डॉ लाड यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक व्यक्तीने आनंदी व समाधानी, निरोगी राहण्यासाठी योग, प्राणायाम करणे आवश्यक आहे. आपण करत असलेलं कार्य हे निश्चितच अनुकरणीय आहे. त्यामुळे मानवत नगर परिषदेच्या वतीने जागा देऊन एक भव्य सभागृह निर्माण करून देण्यात येईल. मला विश्वास आहे की, या माध्यमातून मानवत शहरातील सुदृढ व निरोगी समाज आणि तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग मोलाची कामगिरी बजावेल.

असे होणार ध्यान मंदिर वाघेश्वर नगर मध्ये असलेल्या ओपन स्पेस च्या जागेत दोन मजली ध्यान मंदिराचे बांधकाम होणार असून यासाठी २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यात तळमजल्यावर प्रशस्त असे ध्यान केंद्र पहिल्या मजल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थींना राहण्यासाठी जागा तर दुसऱ्या मजल्यावर वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र करण्यात येणार असून शहरातील भव्य असे अत्याधुनिक विद्युतीकरणासह हे ध्यानमंदिर असेल असे मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी सांगितले.
१७ सप्टेंबर २०२२ रोजी मानवत नगर परिषद येथे जाऊन भास्कर मगर, सुनील बोरबने, दीपक शर्मा ,सचिन कोक्कर, सचिन हिबारे, दत्ता हजारे, नाना कदम व सर्व साधक यांनी डॉ लाड यांची भेट घेतली. एक मानवतावादी व्यक्तिमत्व व अध्यात्मिक गुरु म्हणून गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांची ख्याती जगभरात आहे. ‘तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाज’ हे त्यांचे स्वप्न आहे. यासाठी आर्ट ऑफ लिविंगची शिबिरे आणि उपक्रम सर्वत्र सुरू असतात. हि माहिती दिली होती व त्याच अनुषंगाने मानवत शहरात अत्याधुनिक असे आर्ट ऑफ लिव्हिंग चे ध्यान मंदिर असावे अशी मागणी केली होती हि मागणी लक्षात घेऊन या कामासाठी फार मोठ्या प्रमाणत निधी लागणार असल्याने डॉ लाड यांनी या करीता शासन दरबारी पाठपुरावा केला असता. त्यास यश मिळत या कामाच्या प्रत्यक्ष सुरुवात ७ ऑक्टो रोजी करण्यात आली. या वेळी या कार्यक्रमाला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षका कोमल सावरे , अन्वर सर, नगर अभियंता, आर्ट ऑफ लिविंग शिक्षक भास्कर मगर, सुनिल बोरबने, सूर्यप्रकाश तिवारी नरेंद्र रत्नपारखी, सार्वजनिक बांधकाम विभाग पाथरी उपविभागाचे अभियंता बालासाहेब सामाले, अंकूश गरड, हे उपस्थित होते. या वेळी मुख्याधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना जगभरात सुरू असलेल्या सर्वांच्या शारीरिक व मानसिक आरोग्या मध्ये सुधारणा होण्यासाठी गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या तणावमुक्त व्यक्ती आणि हिंसामुक्त समाज निर्मितीच्या कार्याचे कौतुक केले आणि तेच कार्य आपल्या परिसरामध्ये वाढण्यासाठी ह्या ध्यान मंदिराचा फायदा मानवतकरांना नक्की होईल असे सांगितले.आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने भास्कर मगर यांनी गुरूपूजा आणि डॉ.अंकूश लाड व मुख्याधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पुढील कार्यास सुरुवात करण्यास सुरुवात झाली.

मानवत शहारात भव्य असे अत्याधुनिक ध्यान मंदिर होणार असल्याने आर्ट ऑफ लिव्हिंग चे अशोक भंडारे,कार्तिक तळेकर,प्रभू वाघमारे,सारडा रामस्वरूप, नारायण थावरे(पाथरी),गोपाळ टोपे,हरिभाऊ शिसोदे,शाम दहे,अवि दहे,बाळू शास्त्री,विशाल भालेराव,अरुण कच्छवे ,संजय बाहेती,निवृत्ती गोरे,प्रकाश कदम( लिंबा),परशुराम महात्मे,राजू बुरलेवार,.रंगनाथ कोंडगिर,संतोष रुद्रकंठवार,राजेश टोपे,दत्ता कुठे,दत्ता ठोंबरे,रवींद्र ठाकूर,बाबासाहेब अवचार,सतीश अवचार,गोविंद अवचार,संजय हिबारे,दीपक महिपाल(पाथरी),रामनिरंजन सारडा , बाचेवार लक्ष्मीनारायण, सचिन हिबारे, हरिभाऊ मुळे, ईश्वर अवचार, सोमनाथ लासे,आंबेकर रामचंद्र, सुदाम रासवे,सौ.गरड ताई(पाथरी),भागवत आगे(पाथरी), ठोंबरे सर(पाथरी),हरकळ (पाथरी), नवनाथ कोल्हे(पाथरी), स्नेहा झंवर या साधकांनी नगर पालिका प्रशासनाचे व डॉ अंकुश लाड यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया
मानवत येथील विविध विकासकामात भर म्हणजे आज दिव्यांनंद गार्डन जवळ असणाऱ्या वाघेश्वर नगर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील साधकांना दिलेला शब्द आज पूर्णत्वास नेला असून त्याचे मुख्य पाऊल म्हणजे त्या ध्यान मंदिराचे भीमीपूजन करताना मला मनस्वी आनंद होत आहे अशी भावना या वेळी मानवत शहराचे युवा नेते डॉ.अंकूश लाड व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button