आर्ट ऑफ लिविंग परिवारातर्फे नगर परिषद प्रशासनाचा सत्कार समारंभ
आर्ट ऑफ लिविंग परिवारातर्फे नगर परिषद प्रशासनाचा सत्कार समारंभ
माझी वसुंधरा अभियान 4.0 सर्वेक्षण मध्ये छत्रपती संभाजी नगर (मराठवाडा) विभागामधून मानवत नगर परिषदेने तिसरा क्रमांक पटकावत रुपये 50 लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. यामध्ये शहरातील नागरिकांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरामधून नगरपरिषदेचे व अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक व स्वागत केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे वाघेश्वर गार्डन परिसरामध्ये नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांचे स्वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानवासाठी आरोग्य, आनंदीमय जीवन जगणे काळानुरूप खूप गरजेचे आहे. यासाठी सतत व्यायाम, प्राणायाम, योगसाधना इत्यादी गोष्टींची मानवी जीवनात सातत्य असणे गरजेचे आहे.
यासाठी शहरातील नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगर परिषदेच्या वतीने प्रशस्त जागेची व सभागृहाची व्यवस्था काही कालावधीमध्येच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षक भास्कर मगर, सुनील बोरबने, नरेंद्र रत्नपारखे, व तसेच सचिन कोकर किराणा असोसिएशन अध्यक्ष इतर सदस्यांनी नगर परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी उपस्थित मानवत शहराचे युवा नेते मा.श्री. डॉ.अंकुश भाऊ लाड यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर लाड यांनी असे सांगितले की शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तळागाळातील सर्व घटकांचा विकास साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आमच्या वतीने करण्यात येत आहेत व हेच कार्य सतत यापुढे चालू राहील. याचबरोबर आर्ट ऑफ लिविंग यांचे आभार सुद्धा त्यांनी मानले.
यावेळी आर्ट ऑफ लिविंग चे साधक डॉ.योगेश तोडकरी यांनी मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की नागरिक या नात्याने आम्ही नगरपरिषदेच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये नेहमी सहभागी होऊ व आपल्या शहराला एक नावलौकिक मिळवण्यासाठी सतत असे उपक्रम राबवत राहू जेणेकरून काम करण्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल.
तसेच आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक भास्कर मगर यांनी मनोगत व्यक्त करताना नगरपरिषद प्रशासनाचे व युवा नेते डॉक्टर अंकुश लाड यांचे आभार व्यक्त केले कारण योग साधनेसाठी ध्यान केंद्र उभारणीसाठी काम लवकरच सुरू होईल याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच पुढील हॅप्पीनेस प्रोग्राम दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी के.के.एम कॉलेज या ठिकाणी सुरू होणार असून शहरातील नागरिकांनी शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे सांगितले.
यावेळी आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षिका श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत यांचा भव्य सत्कार आर्ट ऑफ लिविंग परिवारातर्फे करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी असे सांगितले की शहरातील नागरिकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य या गोष्टींचा प्रामुख्याने विचार होणे गरजेचे असते. माझी वसुंधरा अभियान मध्ये नगर परिषदेने जो क्रमांक व पारितोषिक पटकावले आहे ते शहरातील नागरिक,आर्ट ऑफ लिविंग सारख्या संस्था व इतर मित्रमंडळी यांच्यामुळे शक्य झाले आहे. यापुढे सुद्धा नागरिकांनी नगरपालिकेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा जेणेकरून भविष्यातील राज्य पातळीवरील व देश पातळीवरील पारितोषिके व क्रमांक मिळविण्यासाठी नगरपालिकेला मदत होईल. शहर स्वच्छ व सुंदर राहील असे आवाहन केले व आर्ट ऑफ लिविंग चे मनापासून आभार व्यक्त केले.
यावेळी आर्ट ऑफ लिविंग च्या स्वयंसेवक श्री दीपक शर्मा व श्री मनीष उपलंचेवार यांचे व इतर सर्व समन्वयकांचे नगर परिषदेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित युवा नेते मा.श्री.डॉ.अंकुश भाऊ लाड, श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत, नगरपरिषदेचे नगर अभियंता श्री सय्यद अन्वर, भगवानराव शिंदे, महेश कदम,लेखापाल, राजेश शर्मा, संतोष खरात, भारत पवार, संतोष उन्हाळे, वसीम शेख, पंकज पवार, वंदना इंगोले, शितल सोळंके व इत्यादी सर्व अधिकारी कर्मचारी व स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक हनुमंत बिडवे यांनी केले.