आय वॉन्ट चेंज लघु चित्रपटचे उदगीर येथे लोकार्पण
संक्षिप्त कथा I Want Change हे कथानक महाराष्ट्रातील एका गरीब विद्यार्थीनीचे आहे. या मुलीच्या जीवनात अनेक व्यथा आहेत. संपूर्ण कथानक मुलीच्या अवती-भोवती फिरते. व्यसनाधीन बाप, घरकाम करणारी, अशिक्षीत आई, सहकार्य न करणारे वर्ग मित्र-मैत्रिणी व शाळेतील शिक्षकवृंद यांना आपल्या व्यथा न सांगता अनोख्या मार्गाने, सर्वांना समजावण्याचा प्रयत्न करते. शाळेतील मुख्याध्यापक एक दिवस खरोखर या मुलीची चिकाटी, जिद्द बघुन, मुख्याध्यापकांच्या मानसिकतेत बदल होतो. अशी ही अनोखी, अनुठी, वैशाली

उदगीर प्रतिनिधी : उदगीर येथील बहुचर्चित प्रतीक्षेत असलेले लघु चित्रपट आय वॉन्ट चेंज (मला बदल हवा) दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजता हॉटेल व्हि २ रिंग रोड उदगीर येथे लोकार्पण करण्यात आले. दीप ज्योती फिल्मस प्रस्तुत सदर लघु चित्रपटाचे दिग्दर्शन दत्ताजी उदगीरकर यांनी केले. I Want change चे निर्माते डॉ.दीपक सोमवंशी आहे तर कार्यकारी निर्माते शेषराव फावडे व चंद्रकांत गणपतराव मादळे यांनी चित्रपटासाठी खूप परिश्रम घेतले केले.
I want change लघु चित्रपटात वैशालीची मुख्य भूमिका करणारी कु.अंकिता चंद्रकांत मादळे खुप उत्कृष्ट अभिनय केल्याचे दिसून येते. इतर कलाकारांचे (अक्षय बिरादार, सविता मलकापुरे,डॉ.केरबा कांबळे, प्रणिता संगमे, डॉ.संजय शिंदे वैष्णवी पटवारी,स्नेहा पटवारी, राम संगमे, अनंत कदम, संजय जाधव, शेषराव फवडे) यांचे ही काम मनाला भावेल असेचे आहे. ग्रामीण भागातील एक छोट्याशा गावातील एका गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीची आहे. विद्यार्थ्याची व्यथा यांचे पालक, वर्ग मित्र मैत्रिणी परिस्थितीमुळे समजू शकत नव्हते तर शाळेतील बहुतांश शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनीची मानसिकता समजून घेऊ शकले नाहीत यात त्या विद्यार्थ्यांची झालेली कुचंबणा व व्यथेने त्रस्त होऊन सदर परिस्थितीवर मात करून बदल करण्यासाठी प्रयत्न करणारी हजारातील एक अनोखी अनुटी वैशालीची आहे.