आपले ध्येय मजबूत असेल तर देवही पुढे जाण्यासाठी मदत करतो – श्रीमती मुंदडा
आपले ध्येय मजबूत असेल तर देवही पुढे जाण्यासाठी मदत करतो – श्रीमती मुंदडा
♦ संस्कार क्षम बना संस्कारहीन बनू नका- श्रीमती माहेश्वरी
मानवत प्रतिनिधी – कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर आपले ध्येय हे मजबूत असावे ध्येय मजबूत असेल तरच देव आपणास पुढे जाण्याची मदत करतो असे विचार सोनपेठ येथील श्रीमती कीर्ती बालाप्रसादजी मुंदडा यांनी तर संस्कारक्षम बना संस्कारहीन बनू नका असे विचार आयोध्या श्रीराम मंदिर बांधकाम समितीचे कोषाध्यक्ष परमपूज्य
गोविंद देव गिरीची महाराज यांच्या शिष्या श्रीमती प्रमिला देवी माहेश्वरी यांनी येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात मानवत गीता परिवार व मानवत राजस्थानी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 16 ते 26 वर्ष वयोगटातील युवतीसाठी तेजोमय युवती आत्मरक्षा शिबिराचे आयोजन दिनांक 24 जून ते 26 जून दरम्यान आयोजित करण्यात आले या शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती कीर्ती मुंदडा यांनी व शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका श्रीमती प्रमिला देवी माहेश्वरी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.
सुरवातीला प्रमुख पाहुण्या श्रीमती कीर्ती मुंदडा मार्गदर्शिका श्रीमती प्रमिलादेवी माहेश्वरी मानवत राजस्थान महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. आशा चांडक कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. अनिता पोरवाल व शिबिराच्या आयोजक गीता परिवाराच्या सौ.संगीता तिवारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
शिबिर समारोह कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती कीर्ती बालाप्रसाद मुंदडा यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले आपण भविष्यातील डॉक्टर इंजिनियर आहोत. एक लाख विद्यार्थिनीच्या मागे एक विद्यार्थिनी आपल्यात झाशीची राणी. मा जिजाऊ. व सावित्रीबाई फुले आहेत. आपले विचार शुद्ध ठेवा व चांगल्या विचाराने चांगले बना भविष्यातील येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात अग्रणी होऊन यशस्वी बना यासाठी आपले ध्येय संकल्प मजबूत असणे जरुरी आहे आपले ध्येय संकल्प मजबूत असेल तर देवही आपल्याला मदत करतो. खूप कष्ट व मेहनत करा व प्रतिभाशाली बना स्वावलंबी बना आपली सुरक्षा करून इतरांच्या सुरक्षेसाठी पुढे या. असे विचार श्रीमती कीर्ती बालाप्रसाद मुंदडा यांनी व्यक्त करताना सांगितले.
तर तीन दिवसीय तेजोमय युवती आत्मरक्षा शिबिराच्या मार्गदर्शिका श्रीमती प्रमिलादेवी माहेश्वरी यांनी आपले विचार व्यक्त करताना. आत्मरक्षा शिबिरात भाग घेणारी प्रत्येक युती गणरागिनी व झाशीची राणी आहे. प्रत्येक मुलगी संस्कारमय झाली पाहिजे. शाळा शिक्षणाबरोबर चांगले संस्कार असणे महत्त्वाचे आहे. संस्कारहीन बनू नका. परमपूज्य गोविंददेव गिरीजी महाराज यांनी संस्कारक्षम होण्यासाठी गीता परिवाराच्या माध्यमातून कार्य हाती घेतले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्कारक्षम बना. सध्याच्या काळात लव जिहाद मुळे आपले संस्कृतीवर घातक परिणाम परिणाम होत आहे. समाजात वाईट घटना घडत आहे. ज्या ठिकाणी शिबिर संपन्न झाले तेथे अविरतपणे शिबीर सुरू राहावे चांगले संस्कार ही काळाची गरज आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितले ज्योत से ज्योत जलाते चलो. पालकांनी आपल्या मुला मुलींना मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवा नको तिकडे वळू देऊ नका गीता परिवार हे संस्कारक्षम घडवणारी संस्था आहे. प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे जेथे कौतुक करायचे तेथे करा वेळ आल्यास कटोरी बना आत्मरक्षा शिबिरात आपल्या मुलींना पाठवणाऱ्या पालकांचे श्रीमती प्रमिला देवी माहेश्वरी यांनी अभिनंदन केले. समाजासाठी शिबिर हे महत्त्वाचे आहे.सध्याचे काळ हे हृदयाला पिळून टाकणारे आहे. समाजासाठी घातक सिद्ध होत आहे. वेळीच सावधान व्हा.
परम पूज्य स्वामीजी ची इच्छा पूर्ण करण्यासाठी हातात हात घालून सर्वांना सोबत घेऊन चला व कार्यरत व्हा. असे विचार तीन दिवसीय शिबिराच्या मार्गदर्शिका श्रीमती प्रमिला देवी माहेश्वरी यांनी शिबिर समारोप प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले. या तीन दिवसीय आत्मरक्षा सुरक्षा शिबिरात या मुलींनी सहभाग घेतला त्यांनी प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शेवटी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता परिवाराच्या मराठवाडा सचिव.सौ. संगीता तिवारी यांनी केले तर आभार सोमानी यांनी मांनले. या तेजो में आत्मरक्षा युवती प्रशिक्षण शिबिरात मानवत व ईतर भागातील जवळपास 60 ते 70 मुलींनी सहभाग घेतला.