आजच्या काळात पुस्तके म्हणजेच विद्यार्थ्यांचे शस्त्र होय – डॉ.जगदीश नाईक
आजच्या काळात पुस्तके म्हणजेच विद्यार्थ्यांचे शस्त्र होय – डॉ.जगदीश नाईक
मानवत प्रतिनिधी
‘माझा समाज’ च्या माध्यमातूनआज मानवत येथे महाकवी चंदवरदाई सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन मानवतचे पालक या नात्याने जिम्मेदारी स्वीकारलेले डॉ. जगदीश नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. आजच्या काळात पुस्तके हेच विद्यार्थ्यांचे शस्त्र आहेत असे त्यांनी यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले.
सविस्तर वृत्त असे की ‘माझा समाज’ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील ज्या ज्या गावांमध्ये राजपूत समाजाचे वास्तव्य आहे त्या सर्व गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वाचनालय निर्मिती करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गावात वाचणालय निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यात आले.त्यानुसार मागील दोन महिन्यापूर्वी नांदेड येथे संपन्न झालेल्या राजपुत समाजाच्या शिक्षण परिषदेमध्ये सर्वांनुमते असे ठरले की प्रत्येक गावामध्ये महाकवी चंदवरदाई सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्र असे नाव ठेवुन वाचणालय स्थापन करावे आणि समाजातील सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासिका केंद्र स्थापन करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून स्पर्धा परीक्षेसाठी तयार केले पाहिजे. कारण आता इंटरनेटचे युग असल्याने जवळपास सर्वच विद्यार्थ्यी मोबाईलचा अती प्रमाणात वापर करत आहेत त्यामुळे वाचन संस्कृती संपुष्टात येते की काय असे वाटायला लागले आहे म्हणून सर्वांनी ‘माझा समाजाच्या’ माध्यमातून सर्व गावात एक वाचनालय निर्मिती करून विद्यार्थ्यांना आणि ज्यांना कोणास वाचनाची आवड असेल अशांची देखिल सोय व्हावी या उद्देशाने एक वाचनालय स्थापन करावे.त्यानुसार मागील 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील काही गावात तर परभणी जिल्ह्यातील काही गावांमध्ये वाचनालय स्थापन करण्यात येऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी आणि स्पर्धा परीक्षा बाबतचे मार्गदर्शन सुरू करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आज मानवत येथील महाकवी चंदवरदाई सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन मानवत चे पालकत्व स्वीकारलेले परभणी येथील डॉ. जगदीश नाईक त्यांच्यासोबत डॉ. रामेश्वरजी नाईक हे देखील कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मानवत शहरातील सर्व राजपूत समाजातील माझा समाजाचे सर्व कार्यकर्ते तसेच शहरातील राजपूत समाजासह इतर समाजातील मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर्स,शेतकरी, पालकवर्ग, शिक्षक, नेते तसेच माताभगिनी विद्यार्थीमित्र उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मानवत येथील शिवाजीनगर भागातील मानवत टाईम्स चे संपादक गोपाळराव लाड यांच्या निवासस्थानी करण्यात आले. बाजूस असलेल्या श्री विश्वकर्मा मदिंर सभागृहामध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी व्यासपिठावर डॉ. जगदीश नाईक डॉ. रामेश्वरजी नाईक, प्रा.विठ्ठलराव डांगे सर,प्रतिष्ठीत व्यापारी ज्ञानेश्वर मोरे,साने गुरूजी वाचणालयाचे सचिव रेनकोजी दहे हे देखिल उपस्थित होते मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी कच्छवे सर प्रास्ताविक गोपाळराव लाड तर आभार प्रदर्शन सदाशिव होगे सर यांनी केले कार्यक्रमासाठी मोहनराव लाड गोपाळराव लाड तसेच माता-भगिनींनी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. राष्ट्रगीतांने कार्यक्रम संपन्न झाला.