अर्लिअन कवियों अध्यात्म प्रा लि या कंपनीतर्फे 15 सप्टेंबर रोजी वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न
अर्लिअन कवियों अध्यात्म प्रा लि या कंपनीतर्फे 15 सप्टेंबर रोजी वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
कोल्हापूर प्रतिनिधी : अर्लीअन कवियों का अध्यात्म प्रा. लि. या कंपनीतर्फे दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी कोल्हापूर येथील नरसोबाची वाडी येथे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक व युवा उद्योजक डॉ. सागर गुडमेवार, कंपनी कोल्हापूर विभागाच्या उपाध्यक्ष सौ.रोहिणी पराडकर, कंपनीतील सदस्य ऋचा महाबळ, शैलजा परमने, अनिता भोई, सुलोचना पाटील या सर्वांनी विविध फळांची यामध्ये आंबा, चिकू, पपई आणि फुलांच्या यामध्ये गुलाब इत्यादी झाडांची लागवड केली.
सर्व सदस्यांना परिसरातील झाड पानांपासून शिकवण घेण्यास व त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितली. डॉ. सागर गुडमेवार यांच्या मते “आई-वडिलांनंतर निसर्ग आपली सर्वात जास्त काळजी घेतो.” कंपनीद्वारे अशा प्रकारचे निसर्ग पोषक उपक्रम नेहमी राबवण्यात येतील असे आश्वासन दिले.
सांगलीतील सोनी या गावामध्ये महिलांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दरम्यान कोल्हापूर विभागाच्या उपाध्यक्ष सौ.रोहिणी पराडकर यांनी लैंगिक अत्याचारा संदर्भात विविध प्रश्न स्त्रियांसमोर मांडून त्यांना चर्चेमध्ये सहभागी केले.
दरम्यान स्त्री शक्तीला नवी दिशा देणाऱ्या ‘मनदर्पण’ या ऋचा महाबळ लिखित संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. सौ.सुलोचना पाटील यांनी चर्चासत्राच्या प्रारंभापासून ते शेवटापर्यंत सगळ्या गोष्टींचे आयोजन नियोजन सुंदर रित्या केले याबद्दल समस्त गावातील सदस्यांसमोर कंपनीतर्फे त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
उपस्थित सर्व बायकांना अर्लीअन कवियों का अध्यात्म कोल्हापूर मराठी प्रतिष्ठान समूहातर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.