अन्नदान हेच महादान
अन्नदान हेच महादान
वसमत प्रतिनिधी : आर्य वैश्य महीला मंडळ वसमत तर्फे 15 ऑगस्ट निमित्त अन्नदान वाटप कार्यक्रम राबविण्यात आला. हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवून समाजातील गोरगरीब व गरजवंताना मदतीचा हात देण्यात आला.
“अन्नदान हे सर्वात श्रेष्ठदान,”
या भावनेतून, व श्रावण मासाचे निमित्ताने वसमत येथील झोपडपट्ट्यांमध्ये कोरडे अन्न जसे साबुदाणा ,भगर, पोहे, तांदूळ ,डाळ ,गहू, तेलपॅकेट, गुळभेली, केळी, इत्यादी वाटप करण्यात आले. झोपडपट्ट्या मधील अवस्था पाहून खूप दुःख वाटले. आमचे छोटीशी मदत म्हणून 15 ऑगस्ट निमित्त अन्नदान हा उपक्रम राबवण्यात आला असे प्रतिपादन हिंगोली महिला महासभा जिल्हाध्यक्ष सौ रुपाली दलाल यांनी व्यक्त केले.
यावेळी सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची संकल्पना रूपाली दलाल यांची होती. यावेळी आर्य वैश्य समाज वसमतचे सर्व महिला मंडळाचे पदाधिकारी सौ संगीता मुगुटकर सौ संगीता कोटलवार सौ श्रेया दलाल सौ वर्षा कोटलवार सौ विद्या कोसलगे सौ रेखा रुद्रवार सौ लीना गुंडेवार सौ जोत्स्ना कोसलगे सौ रुपा डुबेवार सौ वंदना कोकडवार सौ. अनुसया दलाल सौ नंदा कोसलगे उपस्थित होते. शंभराहून अधिक महिला, लहान मुले यांना मदतीचे वाटप करण्यात आले.
सर्वांनी सहकार्य केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.